राज्यात जंगलाजवळ वसली आहेत १५ हजार गावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 01:42 PM2021-03-04T13:42:32+5:302021-03-04T13:43:37+5:30

Nagpur News पेंच व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने शासनाच्या धाेरणांची काटेकाेर अंमलबजावणी करून वन्यजीव व स्थानिकांच्या उपजीविकेचा सुवर्णमध्य साधला आहे. पेंच अंतर्गत येणाऱ्या पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यात त्याबाबत उपक्रम राबविले आहेत.

There are 15,000 villages near forests in the state | राज्यात जंगलाजवळ वसली आहेत १५ हजार गावे 

राज्यात जंगलाजवळ वसली आहेत १५ हजार गावे 

Next
ठळक मुद्देशाश्वत विकासासाठी स्थानिकांच्या सक्षमीकरणावर भर पेंच व्याघ्र प्रकल्पाने साधला सुवर्णमध्य

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास येथील वनांमध्ये किंवा वनांजवळ १५ हजाराच्या जवळपास गावे वसलेली आहेत. येथील ग्रामस्थांच्या गरजा वनाेपजांवर अवलंबून आहेत. अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प घाेषित झाल्याने लाेकांना समस्यांना ताेंड द्यावे लागते आणि संघर्षही निर्माण हाेताे, जाे वनसंवर्धनासाठी चांगला नाही. त्यामुळे वनांचा शाश्वत विकास साधायचा असेल तर स्थानिकांच्या सक्षमीकरणावरही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने शासनाच्या धाेरणांची काटेकाेर अंमलबजावणी करून वन्यजीव व स्थानिकांच्या उपजीविकेचा सुवर्णमध्य साधला आहे. पेंच अंतर्गत येणाऱ्या पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यात त्याबाबत उपक्रम राबविले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डाॅ. रविकिरण गाेवेकर यांनी सांगितले, गेल्या पाच वर्षात पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत एकूण १५९ गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद जन-वन-योजनेअंतर्गत सुमारे ४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन १.८० लक्ष लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिले. एल पी जी गॅसची सुविधा, शौचालयाचे बांधकाम, सौरकुंपण, शेती उपयोगी साहित्य पुरविणे, दुधाळ जनावरांचे वाटप, सुधारित चुलीचा पुरवठा, सौरदिवे वाटप यांसह गावांमध्ये पाण्याची सोय करण्यासाठी शेततळी/बोअरवेल, ई-लर्निंग सुविधा शाळांमध्ये पुरविणे, शुध्द पाण्याचे फिल्टर्स पुरविणे, जल व मृद संवर्धनाची कामे करणे आदी कामे केली जात आहेत.

व्याघ्र संवर्धन फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे १००० च्यावर युवक-युवतीना पेंच फाऊंडेशन व प्रथम यांच्या माध्यमातून आदरातिथ्याचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देण्यांत आली आहे. त्याचप्रमाणे चालक, वीजतंत्री, गवंडी, तांत्रिक, कौशल्य आधारित कार्यशाळा, टेक्टस्टाईल आदीकरिता युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात व बोर व्याघ्र प्रकल्प येथे मोबाईल आरोग्य वाहनांव्दारे डॉक्टर गावागावात जाऊन लोकांची तपासणी, मोफत औषधे आणि हेल्थ कॅम्प घेत तीन वर्षात ४१ हजार पेक्षा जास्त लोकांना लाभ दिला.

सफारी शुल्काचे हाेते काय

जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून पेंच व्याघ्र संवर्धन फाऊंडेशनच्यावतीने ‘सफारी शुल्काचे हाेते काय’ या आशयाचे पाेस्टर लाॅन्च करण्यात आले. वनांचा शाश्वत विकास साधण्यासह स्थानिकांना राेजगार देऊन या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी या शुल्काचा उपयाेग केला जात असल्याचे याद्वारे सांगण्यात आले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर यांच्यासह पेंच प्रकल्प संचालक व मुख्य वनसंरक्षक डाॅ. रविकिरण गाेवेकर, उपसंचालक अमलेंदू पाठक प्रामुख्याने उपस्थित हाेते. सहायक वनसंरक्षक अतुल देवकर यांची ही संकल्पना हाेती.

Web Title: There are 15,000 villages near forests in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.