शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

...तर आम्ही दोघेच २४-२४ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 10:36 IST

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.

नागपूर-  देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी अजुनही इंडिया आघाडीसोबत गेलेली नाही, त्यांच्यासोबत बोलणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण वंचित आघाडीने शिनसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासोबत निवडणूक लढण्याचे जाहीर केले नाही. दरम्यान, आता वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनीलोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला सांगितला आहे. 

"उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच आणि आमचे आधीच निवडणुकांबाबत ठरवून जाहीर केले होते. त्यात आम्ही असं ठरवलं होतं की,सेनेच काँग्रेस बरोबर, सेनेच एनसीपी बरोबर असं झालं नाही तर आमच्यामध्ये ५०-५० टक्के लढण्याचा निर्णय झाला होता. २४ जागा आम्ही २४ जागा ते लढणार असा मोगम अन्डस्टन्डींग झालं होतं पण त्यांच ठरल तर मग वेगळा फॉर्म्युला होऊ शकतो, असा फॉर्म्युला वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला. 

२०२४ च्या लोकसभेत भाजपा 'इतक्या' जागा जिंकेल, दुसरा पर्याय नाही; नाना पाटेकरांचा दावा

स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल

प्रकाश आंबेडकर म्हणाले, इंडिया आघाडीत आपण एकत्र लढलो तर स्वागतच आहे.  जो कोणी उमेदवार असेल तो जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशी खूणगाठ मनाशी बांधा.  ज्या पक्षाला पाठिंबा दिला असेल,  त्या पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक बूथवर किमान ५०० मते मिळालीच पाहिजेत. यासाठी वाट्टेल ते करा. एकत्र आलो तर ठीक नाही तर स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.

आरक्षणाच्या नावाखाली राज्यात  मराठा-ओबीसी व धनगर-आदिवासी यांच्यात वाद निर्माण केला जात आहे. सध्या देशात व राज्यात दबावाचे, दगाबाजीचे आणि ब्लॅकमेल करण्याचे राजकारण सुरू आहे.  यातून पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न आहे.  ‘वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो’ काही गोष्टी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या चुकल्या तशा नागपूरकरांच्याही चुकल्या आहेत. घाबरता कशाला, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा