-तर सिमेंट रस्त्याचे कंत्राट रद्द करा! महापौरांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 20:30 IST2019-11-30T20:28:39+5:302019-11-30T20:30:02+5:30

काम करण्याची क्षमता आहे की नाही याची शहानिशा करूनच नवीन कंत्राट द्या, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी लोककर्म विभागाच्या बैठकीत दिले.

-Then cancel the cement road contract! Mayor's instructions | -तर सिमेंट रस्त्याचे कंत्राट रद्द करा! महापौरांचे निर्देश

-तर सिमेंट रस्त्याचे कंत्राट रद्द करा! महापौरांचे निर्देश

ठळक मुद्देपरवानगीशिवाय रस्ता खोदणाऱ्यांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात सिमेंट रस्त्यांसोबतच विविध विकासकामे सुरू आहेत. ज्याची क्षमता नाही अशा कंत्राटदारांनी अनेक कामे घेतली आहेत. दोन वर्षापूर्वी कार्यादेश मिळालेले कार्य अद्यापही सुरू झाले नाहीत, ही गंभीर बाब आहे. अशा कंत्राटदाराकडून शपथपत्र घ्या. नसेल देत तर तातडीने कंत्राट रद्द करा, यापुढे काम देताना संबंधित कंत्राटदाराकडे किती कामे आहेत. त्याची काम करण्याची क्षमता आहे की नाही याची शहानिशा करूनच नवीन कंत्राट द्या, असे निर्देश महापौरसंदीप जोशी यांनी शनिवारी लोककर्म विभागाच्या बैठकीत दिले.
शहरातील फूटपाथ, सिमेंट रस्त्यांची गुणवत्ता, चोक झालेल्या ड्रेनेज लाईन, क्षमतेपेक्षा अधिक काम घेणाऱ्या कंत्राटदारामुळे काम पूर्णत्वाला लागणारा विलंब आणि घसरलेली गुणवत्ता या विषयांच्या अनुषंगाने महापालिका मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, राजेश भुते, सोनाली चव्हाण, अमीन अख्तर, महादेश मेश्राम, धनंजय मेंढुलकर उपस्थित होते.
परवानगीशिवाय रस्ता खोदला तर कारवाई
महापालिकेने कुठे नवा रस्ता बनविला तर तो खणण्यासाठी शहरात कार्यरत एजन्सीज सज्ज असतात की काय, असे आता वाटू लागले आहे. अनेक एजन्सीज परवानगी न घेता रस्ता खोदतात. काम केल्यानंतर रस्ता पूर्ववत केला जात नाही. शहरात कार्य करणाºया अन्य विभागांनी यापुढे नागपूर महापालिकेसोबत समन्वय ठेवायलाच हवा. मनपाच्या मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय जर यापुढे शहरातील रस्ते कुठल्या एजन्सीने खणले तर कारवाई केली जाईल, असा इशारा संदीप जोशी यांनी दिला.

Web Title: -Then cancel the cement road contract! Mayor's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.