कोविड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:08 IST2021-04-19T04:08:10+5:302021-04-19T04:08:10+5:30

रजत दीपक टेंभरे (वय २०, रा. योगी अरविंदनगर), रोहित संजय धोटे (वय २९, रा. कुशीनगर, जरीपटका), मनोज रामाजी नंदनकर ...

Theft of Remedesivir at Kovid Hospital | कोविड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविरची चोरी

कोविड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविरची चोरी

रजत दीपक टेंभरे (वय २०, रा. योगी अरविंदनगर), रोहित संजय धोटे (वय २९, रा. कुशीनगर, जरीपटका), मनोज रामाजी नंदनकर (वय २५, रा. आठवा मैल वाडी) आणि महेश दामोदर ठाकरे (वय ३२, रा. जुना बाभुळखेडा, अजनी) अशी आरोपींची नावे आहेत.

----

कोविड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविरची चोरी

नागपूर - क्रीडा चाैकातील ओजस कोविड सेंटरमधून रेमडेसिविर चोरणाऱ्या तेथीलच एका वाॅर्डबॉयला इमामवाडा पोलिसांनी अटक केली. महेंद्र रतनलाल रंगारी (वय २८) असे आरोपीचे नाव आहे.

तो दिघोरीतील विठ्ठलनगरात राहतो. आरोपी रंगारी हा ओजस कोविड सेंटरमध्ये वाॅर्डबॉय आहे. तेथे भरती असलेल्या रजनी नीतेश भोंगाडे (वय ३०, माैदा) यांच्यासाठी आणलेले रेमडेसिविर इंजेक्शन संधी साधून रंगारी याने शनिवारी दुपारी लंपास केले. इंजेक्शन चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर इमामवाडा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हॉस्पिटलचा वाॅर्डबॉय महेंद्र रंगारीने ते इंजेक्शन चोरल्याचे सीसीटीव्हीत दिसले. कोविड सेंटरचे व्यवस्थापक अशोक बिसेन यांची तक्रार नोंदवून घेत इमामवाडा पोलिसांनी आरोपी रंगारीला अटक केली. तो रेमडेसिविर ब्लॅकमार्केट करणाऱ्या टोळीशी संबंधित आहे का, त्याचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: Theft of Remedesivir at Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.