उपचारासाठी तरुणी नागपुरात आली अन् डिप्रेशनमुळे आत्महत्या केली
By योगेश पांडे | Updated: November 8, 2023 14:56 IST2023-11-08T14:48:16+5:302023-11-08T14:56:53+5:30
ती गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती

उपचारासाठी तरुणी नागपुरात आली अन् डिप्रेशनमुळे आत्महत्या केली
नागपूर : उपचारासाठी नागपुरात आलेल्या तरुणीने डिप्रेशनमुळे नातेवाईकाच्या घरीच आत्महत्या केली. लक्ष्मीनगरसारख्या पॉश भागात ही घटना घडली आहे. बजाजनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रिद्धी ओमप्रकाश पालीवाल (२०, सोनार मोहल्ला, पारशिवनी) असे मृतक तरुणीचे नाव आहे. ती उपचारांसाठी लक्ष्मीनगर येथील नातेवाईकांकडे आली होती. ती मागील अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्येदेखील होती. त्याचादेखील उपचार सुरू होता. मंगळवारी दुपारनंतर तिने नातेवाईकाच्या घरामागील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी स्टॅंडला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. नातेवाईकांना ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिला उपचारासाठी एका इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आशीष पालीवाल (४२, जलाराम चौक, भंडारा) यांनी दिलेल्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. आत्महत्येमागे डिप्रेशनचेच कारण आहे की यामागे इतर काही बाब आहे याचा पोलीस तपास करत आहेत.