शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमधील प्रसिद्ध फुटाळा तलाव म्युझिकल फाउंटनचे काम होणार पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:53 IST

सर्वोच्च न्यायालय : स्वच्छ असोसिएशनची याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नागपुरातील लोकप्रिय फुटाळा तलाव पाणथळ (वेटलैंड) नाही, असे स्पष्ट करून म्युझिकल फाउंटन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याची परवानगी दिली. सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन व न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला.

फुटाळा तलावामध्ये म्युझिकल फाउंटन प्रकल्प उभारण्याविरुद्ध स्वच्छ असोसिएशन या पर्यावरणप्रेमी संस्थेने याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळण्यात आली. राज्य पाणथळ स्थळे प्राधिकरणने फुटाळा तलावाला पाणथळ स्थळाचा दर्जा दिला नाही. हा तलाव केवळ मानवनिर्मित जलाशय आहे. तसेच, म्युझिकल फाउंटन प्रकल्पासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत, असे निर्णयात नमूद करण्यात आले. न्यायालयाने जानेवारी-२०२४ मध्ये प्राथमिक मुद्दे विचारात घेता प्रकल्पामध्ये यथास्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, अंतिम सुनावणीनंतर याचिकेतील मुद्दे गुणवत्ताहीन आढळून आले. 

या निर्देशांचे पालन बंधनकारक

पाणथळ स्थळे (संवर्धन व व्यवस्थापन) नियम ४ (२) (६) अनुसार फुटाळा तलावामध्ये कायमस्वरूपी बांधकाम करू नका, कोणतेही बांधकाम करताना या नियमाचे काटेकोर पालन करा, तलावाचे कोणतेही नुकसान होऊ देऊ नका, तलाव स्वच्छ ठेवा व त्याची नियमित देखभाल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. फुटाळा तलावाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. 

उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

  • सुरुवातीला स्वच्छ असोसिएशनने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
  • उच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ती याचिका निकाली काढताना फुटाळा तलावाच्या संरक्षणासाठी विविध निर्देश दिले व म्युझिकल फाउंटन प्रकल्पही कायम ठेवला.
  • त्या निर्णयाला स्वच्छ असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Clears Way for Nagpur's Futala Lake Musical Fountain

Web Summary : The Supreme Court approved the Futala Lake musical fountain project, clarifying it's not a wetland. The court dismissed a petition, upholding the High Court's decision with environmental safeguards. Construction must adhere to regulations, ensuring lake preservation and cleanliness.
टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावnagpurनागपूरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय