महिला गरबाच्या प्रॅक्टिसला गेली अन् चोरट्याने घर फोडले

By योगेश पांडे | Updated: October 20, 2023 13:42 IST2023-10-20T13:42:02+5:302023-10-20T13:42:46+5:30

वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

The woman went to Garba's practice and the thief broke into the house | महिला गरबाच्या प्रॅक्टिसला गेली अन् चोरट्याने घर फोडले

महिला गरबाच्या प्रॅक्टिसला गेली अन् चोरट्याने घर फोडले

नागपूर : नवरात्रोत्सवानिमित्त गरबाच्या प्रॅक्टिसला जाणे एका महिलेला खूपच महागात पडले. घरी कुणीच नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घर फोडून सव्वालाखांहून अधिक किंमतीचे दागिने लंपास केले. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नरेंद्र मनोहरराव महल्ले (४८, मंगलधाम सोसायटी, वाडी) यांची पत्नी गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गरबाच्या क्लाससाठी गेली होती. जाताना त्यांनी घराला कुलूप लावले व चाबी खिडकीजवळ ठेवली. त्यानंतर अज्ञात चोरट्याने ती चाबी घेतली व दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घराच्या बेडरूममधील कपाटात ठेवलेले १.३३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. घरी परत आल्यावर महल्ले यांच्या पत्नीला घरफोडी झाल्याची बाब लक्षात आली. त्यांनी पतीला या प्रकाराची माहिती दिली. महल्ले यांनी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The woman went to Garba's practice and the thief broke into the house