शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षकाच्या 'अमर्याद अधिकारां'बाबतचे सत्य लवकरच समोर येईल; गौतम गंभीरने थरूर यांच्या द्वीटला दिलेल्या उत्तरामुळे वाद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:23 IST

Nagpur : 'पंतप्रधानानंतरचे सर्वांत कठीण काम' या शब्दात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेचे वर्णन करताना बुधवारी नागपुरात कौतुक केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : 'पंतप्रधानानंतरचे सर्वांत कठीण काम' या शब्दात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेचे वर्णन करताना बुधवारी नागपुरात कौतुक केले. त्यावर उत्तर गुरुवारी गंभीर यांनी 'आपल्याच लोकांच्या विरोधात उभे केले जात असल्याचे' पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे द्वीट केले. यावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गंभीर यांनी शशी थरूर यांच्या प्रशंसात्मक ट्रीटवर उत्तर देताना प्रशिक्षकाकडे खरोखरच संपूर्ण अधिकार आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. गंभीर यांच्या ट्रीटमध्ये प्रशिक्षकाला 'अनलिमिटेड अॅथॉरिटी' असते ही गोष्ट खरी नाही, असे सूचित करण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की, गंभीर हे निवड समितीशी असहमती दर्शवत आहेत की फक्त टीकाकारांना उत्तर देत आहेत? गंभीर यांनी कोणाचेही नाव घेतले नसल्याने हा वाद अजूनही अस्पष्ट आहे.

नागपुरात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४८ धावांनी विजय मिळवला. मात्र, या विजयापेक्षा जास्त चर्चा संघाचे कोच गौतम गंभीर यांच्या एका ट्रीटची होत आहे. चाहतेही विविध प्रश्न उपस्थित करत आहेत.

क्रिकेटप्रेमी शशी थरूर यांनी नागपूरमध्ये सामन्यापूर्वी गंभीर यांच्यासोबत एक सेल्फी शेअर केली. सातत्याने होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी माजी भारतीय सलामीवीर गंभीर यांचे कौतुक केले. गंभीर यांनी भारतीय संघाची सूत्रे हाती घेतल्यापासून तिन्ही प्रकारांत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.

सूर्यकुमार यादव याची भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांचे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणे, असे महत्त्वाचे बदल झाले. याच काळात शुभमन गिल याची कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.

थरूर यांचे द्वीट

नागपूरमध्ये माझे जुने मित्र गौतम गंभीर यांच्यासोबत चांगली आणि मनमोकळी चर्चा करण्याचा आनंद घेतला. ते पंतप्रधानानंतर भारतातील सर्वात कठीण जबाबदारी सांभाळत आहेत. दररोज लाखो लोक त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करतात, तरीही ते शांत राहून पूर्ण निर्भयतेने आपले काम करतात. त्यांच्या शांत, दृढनिश्चय आणि सक्षम नेतृत्वाबद्दल कौतुकाचे काही शब्द. आजपासूनच त्यांना सर्व यशासाठी शुभेच्छा.

गौतम गंभीर यांचा प्रतिवाद

गंभीर यांनी उशिरा रात्री प्रतिक्रिया देत त्यांच्या कार्यकाळात चर्चेत राहिलेल्या काही मुद्द्यांचा उल्लेख केला. गंभीर यांनी 'एक्स'वर लिहिले, 'डॉ. शशी थरूर, तुमचे मनापासून आभार. परिस्थिती शांत झाल्यावर प्रशिक्षकाच्या कथित 'अमर्याद अधिकारां'बाबतचे सत्य आणि तर्क स्पष्ट होतील. तोपर्यंत मला स्वतःलाच माझ्याविरुद्ध उभे केलेले पाहून हसू येत आहे.'

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gautam Gambhir's reply to Tharoor sparks row over coach's power.

Web Summary : Gautam Gambhir's response to Shashi Tharoor's praise has ignited controversy. Gambhir questioned the coach's 'unlimited authority,' hinting at disagreements with the selection committee. The debate intensified after India's T20 victory over New Zealand, with fans questioning the changes within the team.
टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरShashi Tharoorशशी थरूरnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी