शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

टिप्पर चालकाने चौघांना चिरडले, मुलाचा मृत्यू; आजोबासह तिघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 11:31 IST

या अपघातांमुळे कापसी, पारडी परिसर तसेच रिंग रोडवर प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपूर : दारुड्या टिप्पर चालकाने पारडी-कापसी मार्गावर रविवारी दुपारी हैदोस घालून चाैघांना चिरडले. यात एका १३ वर्षीय मुलाचा करुण अंत झाला तर त्याच्या आजोबासह तिघे गंभीर जखमी झाले. शहरात राष्ट्रपती महोदयांसह अनेक व्हीव्हीआयपी आले असताना घडलेल्या या अपघातामुळे शहरात मोठी खळबळ निर्माण झाली होती.

मृत बालकाचे नाव रूपेश बृजेश साहू (वय १३) असून त्याचे आजोबा किसनलाल शिवचरण साहू (वय ५७, रा. झेंडा चाैक, विजयनगर, कळमना) तसेच सुरेश तितरमारे आणि किरण नारायणराव कातोरे (वय ३८, रा. चांदूर रेल्वे) अशी जखमींची नावे आहेत. या अपघाताला कारणीभूत असलेल्या आरोपी टिप्पर चालकाचे नाव भरतलाल पतीलाल इरपाचे (वय ३९, रा. डोंगरगाव, बुटीबोरी) असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी इरपाचेने मोठ्या प्रमाणात दारू पिऊन डोंगरगाव येथून टिप्पर क्रमांक एमएच ४० एके ६९४५ मध्ये गिट्टी आणि बोल्डर भरून स्मार्ट सिटी प्रकल्पात आणली. ती खाली केल्यानंतर इरपाचे दारूच्या नशेत टिप्पर घेऊन वेगात कापसी पुलाजवळून निघाला. दुचाकीवर जात असलेल्या किसनलाल साहू आणि त्यांचा नातू रूपेश या दोघांना टिप्परने चिरडले. रूपेशचा जागीच मृत्यू झाला तर किसनलाल गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर आरोपी इरपाचेने टिप्पर थांबवण्याऐवजी पळून जाण्यासाठी वेगात दामटला. काही अंतरावरच त्याने सुरेश शामराव तितरमारे आणि किरण नारायण कातोरे या दोघांना उडवले. त्यानंतरही आरोपी थांबायचे नाव घेत नव्हता.

अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावातील काही जण पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्याने तो बेभान झाला होता. त्याने तेलंगणाला जाणाऱ्या एपी २३- यू १५१० क्रमांकाच्या टँकरला त्याने जोरदार धडक मारली. दरम्यान, या अपघाताच्या मालिकेची माहिती कळताच कंट्रोल रूमच्या पोलिसांनी त्या भागातील पारडी, वाठोडा, कळमना आणि हुडकेश्वर पोलिसांना तातडीने टिप्परचालकाला रोखण्याचे आदेश दिले. त्यामुळे हादरलेल्या सर्व पोलीस ठाण्यांतील गस्तीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. पारडी पोलिसांनी काही अंतरावर टिप्परचालकाला अडविले. तो दारूच्या नशेत टुन्न होता. त्याला ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्य वधाच्या आरोपाखाली कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, या अपघातांमुळे कापसी, पारडी परिसर तसेच रिंग रोडवर प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

आत्याकडे निघाला होता रूपेश

रूपेशची आत्या (किसनलाल यांची मुलगी) त्याच मार्गावर वडोदा येथे राहते. तिच्याकडे असलेल्या कार्यक्रमासाठी रूपेश आजोबासोबत दुचाकीने जात होता. मात्र, इरपाचे चालवत असलेल्या टिप्परच्या रूपातील काळाने त्याच्यावर मध्येच झडप घातली.

वाढते अपघात, समाजमन चिंतित

शहरात जीवघेण्या अपघातांची संख्या सारखी वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघात वाढत असल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तीन दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना चिंता व्यक्त करून प्रभावी उपाययोजना करण्याचे संकेत दिले होते. त्याच्या काही तासांनंतरच शुक्रवारी रात्री उमरेड मार्गावर भीषण अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाला. आजही अपघाताची मालिका झाली. बुधवारी आणि शुक्रवारीसुद्धा विविध भागात अपघातांनी बळी घेतले. त्यामुळे समाजमन चिंतित झाले आहे.

हिंगणा, प्रतापनगरातही दोघांचा अपघाती मृत्यू

हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास अपघात झाला. त्यात बुटीबोरीतील अक्षय मुनेश्वर डोंगरे (वय २०) याचा करुण अंत झाला. तर दुचाकीवर बसलेला प्रकाश प्रभाकर बारी (वय २८, रा. सुकडी, हिंगणा) जबर जखमी झाला. त्याचप्रमाणे धंतोलीतील विश्रामनगरात राहणारे सुदर्शन गिरिधरशरण तिवारी (वय ३६) यांना नरेंद्रनगर ते छत्रपती चाैकादरम्यान भरधाव वाहनचालकाने धडक मारली. त्यामुळे तिवारी यांचा करुण अंत झाला. ४ मेच्या मध्यरात्री हा अपघात झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूnagpurनागपूर