इस्पितळातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत वाहनचोरांना अटक
By योगेश पांडे | Updated: September 27, 2024 15:24 IST2024-09-27T15:18:44+5:302024-09-27T15:24:59+5:30
Nagpur : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई

The thieves who stole the bike from the hospital were arrested
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लता मंगेशकर इस्पितळाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत वाहनचोरांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आणखी एक दुचाकी चोरल्याचीदेखील कबुली दिली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
रविंद्र धोटे (५०, विठ्ठलनगर) यांची मोटारसायकल १५ सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या लता मंगेशकर इस्पितळाच्या पार्किंगमधून चोरी गेली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी अर्चित गोविंदराव वंजारी (२०, भीमनगर वस्ती) व कार्तिक पुरुषोत्तम चौरागडे (१९, आनंदनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनदेखील एक दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एमएच ४० एई ४१२० तसेच नंबरप्लेट नसलेली दुचाकी जप्त केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, संजय बन्सोड, दीपक ठाकूर, स्माईल नौरंगाबादे, गजानन राठोड, पंकज मिश्रा, विवेक झाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.