अवघ्या काही तासात सापडला चोरी गेलेला मोबाईल

By योगेश पांडे | Published: January 3, 2024 08:04 PM2024-01-03T20:04:08+5:302024-01-03T20:04:16+5:30

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चाचपणी केली व आजुबाजूच्या परिसरात शोध सुरू केला.

The stolen mobile phone was found in just a few hours in nagpur | अवघ्या काही तासात सापडला चोरी गेलेला मोबाईल

अवघ्या काही तासात सापडला चोरी गेलेला मोबाईल

नागपूर : रस्त्यावरून चोरी गेलेला महागडा मोबाईल पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत परत मिळविण्यात यश आले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास राजकुमार मिश्रा ( ३४, संजयनगर, अंबाझरी) हे अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभात रेस्टॉरेंटसमोरून जात असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या खिशातून २५ हजारांचा मोबाईल लांबविला. फोन चोरी गेल्याचे लक्षात येताच मिश्रा यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चाचपणी केली व आजुबाजूच्या परिसरात शोध सुरू केला. अंबाझरी टी पॉईंटजवळील वडाच्या झाडाखाली एक व्यक्ती संशयास्पदपणे बसलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने त्याचे नाव प्रशांत रमेश जोंधळ (३८, पांढराबोडी) असल्याचे सांगितले. त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून मोबाईल जप्त केला.

Web Title: The stolen mobile phone was found in just a few hours in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.