शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार

By कमलेश वानखेडे | Updated: September 2, 2023 15:25 IST

गृहखात्याच्या इशाऱ्यावर  हा लाठीचार्ज झाला

नागपूर : मराठा समाजावर अमानुष लाठीचार्ज झाला, राज्य सरकारची उदासीनता या घटनेला कारणीभूत आहे. ईडब्ल्यूएसमुळे तसेही 50 टक्क्यांवर आरक्षण गेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर करून केंद्राला पाठवून आरक्षण द्यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राणे सामितीने निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर आरक्षण रद्द केले. ही लढाई आता न्यायालयीन राहिली नाही, इन्द्रा सहानीच्या निर्णयानंतर ईडब्लुएसला १० टक्के आरक्षण रस्त्यावर न उतरता देऊ शकते,  मग मराठ्यांना का देऊ शकत नाही, न्याय देण्याची भूमिका का घेत नाही ? एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलाने पाठवलेले पत्रत ठोस उत्तर नाही. कालच्या घटनेचे व्हिजुअल पाहिले, पंडालमध्ये जरांगेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पोलीस पोहचले. हे आंदोलन संपवण्यासाठी पोलीस कोणाच्या आदेशाने पोहचले? संरक्षण तोडण्यासाठी महिलांनी कठडा केला असताना घोषणा देत असताना लाठीचार्ज सुरू केला असता मराठा समाजाच्या तरुणांनी आक्रोश केला, पण गृहखात्याच्या इशाऱ्यावर  हा लाठीचार्ज झाला, असे वडेट्टीवार म्हणाले.

मराठा समाजासोबत बनवाबनवी सुरू आहे. मागील महिन्यात ४ दलितांवर हल्ला झाला, वारकऱ्यांना मारहाण झाली. आंदोलनाचे मोठं स्वरूप होईल म्हणून आंदोलन चिघळले. केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरच्या विशेष अधिवेनशनात हा मुद्दा मांडून आरक्षण द्यावे. ओबीसीत आरक्षण द्यायचे असल्यास त्यात २७ टक्क्यावरून वाढ करून त्यातून द्या, आम्हाला  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भूमीका स्पष्ट आहे, मराठा समाजाला आमचा पाठिंबा आहे... म्हणजे आम्ही आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे सांगू. आमचा विरोध नाही, 52 टक्के ओबीसींची लोकसंख्या आहे, मराठा संख्या जोडल्यास संख्या 25 टक्के जाईल, त्यामुळे आरक्षण वाढवणे ही आमची भूमिका आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

मतांसाठी हा विषय सुद्धा पुढे येईल, ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटेल अशी शक्यता आहे, त्यामुळे सगळ्यांनी सावध व्हावे. हिंदू मुस्लिम करून दंगा करून यश मिळत नसल्याने हा विषय आणला जाऊ शकतो, मतांसाठीचा हा खेळ असू शकते, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

सर्वोच्च न्यायलयात रिव्हिज्यु पिटीशन मधून काहिच होणार नाही. राजकीय इच्छाशक्ती शक्तीतून यातुन मार्ग निघेल. न्यायालयाच्या लढाईतून काही होणार नाही. आता राजकारण करत आहे असे म्हणण्यात अर्थ नाही, घटना निंदनीय आहे, विरोधक आपली बाजू समजून घेण्यासाठी जातील. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच हा विषय सुटू शकतो.

वन नेशन वन इलेक्शन आता का?

यापूर्वी सुद्धा वन नेशन होते, मग आताच  वन नेशन वन इलेक्शन आता का? यासाठी राज्याची संमती लागते, 12 मुख्यमंत्री आमच्याकडे आहे, यात सगळ्यांची संमती असल्यास ते असले तर त्यांनी ते करावे. सद्या जनतेची दिशाभूल केली जात आहे. केंद्र सरकारला पराभव दिसत असून पाच राज्याचे सर्व्हे भाजप विरोधात आल्याने हे त्यांनी पिल्लू सोडले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारOBCअन्य मागासवर्गीय जातीmarathaमराठा