शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

निवासी उपजिल्हाधिकारीपद अतिरिक्त जिल्हाधिकारी करणार ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By आनंद डेकाटे | Updated: August 1, 2025 17:35 IST

Nagpur : महसूल सप्ताहानिमित्त विविध योजनांचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हे पद महत्वाचे असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी ते पद अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीमध्ये रूपांतरीत करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे शुक्रवारी जाहीर केले.

नियोजन भवन येथे महसूल दिन व सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार परिणय फुके, चरणसिंग ठाकूर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महसूल अपर आयुक्त राजेश खवले, अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे उपस्थित होते.

यावेळी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते आपले सरकार सेवा केंद्राचा पोर्टलचे अनावरण, नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, डिजिटल गाव नकाशा पोर्टलचे लोकार्पण. प्रधानमंत्री आवास योजना, जात प्रमाणपत्र वितरण, मालकीहक्काचे पट्टे वाटप, रेशन कार्ड वितरण, भूमिअभिलेख विभागातर्फे सनद वाटप करण्यात आले.

येत्या तीन महिन्यात झिरो पेन्डंसी उपक्रम राबवामंत्रालयस्तरावर महसुलासंदर्भात प्रलंबित असलेल्या १३ हजार प्रकरणे निकाली काढण्याचा संकल्प असून त्याप्रमाणेच नायब तहसिलदार ते जिल्हाधिकारीस्तरापर्यंत प्रलंबित असलेले महसूली प्रकरणे येत्या तीन महिन्यात निकाली काढण्याचा झिरो पेन्डंसी उपक्रम राबवा, अशा सूचना महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवमहसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी वंदना सवरंग पते, विशालकुमार मेश्राम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, दत्तात्रय निंबाळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, नगर भुमापन अधिकारी प्रशांत हांडे, उपअधीक्षक श्याम पेंदे, नायब तहसीलदार प्रतिभा लोखंडे, सचिन शिंदे, नितीन गोहणे, सहायक महसूल अधिकारी निजाम शेख, मंडळ अधिकारी पंकज तांबे, महसूल सहायक अमरदीप शिरसाट, तलाठी पवन राणे, स्वीय सहायक संजय गिरी, शिपाई रामेश्वर पुरी, सोनु भुरे, वाहनचालक समीर दांडेकर, कोतवाल अनिल उरकुडे, पोलीस पाटील बाळकृष्ण चौधरी, निवृत्त नायाब तहसीलदार अरूण भुरे, अर्चना तितरमारे यांचा समावेश आहे. यावेळी १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर