राज्य सरकारकडून गरिबांना मिळणार २५ वर्षे मोफत वीज; काय आहे योजना? समजून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:08 IST2025-11-04T18:07:51+5:302025-11-04T18:08:45+5:30
Nagpur : महावितरणने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने ही 'स्मार्ट' योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश १.५४ लाख बीपीएल ग्राहकांचे वीज बिल पूर्णपणे समाप्त करणे हा त्याचप्रमाणे महिन्याला आहे.

The poor will get free electricity for 25 years from the state government; What is the scheme? Understand
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गरिबीरेषेखालील बीपीएल व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या घरांच्या छतांवर सोलर रूफटॉप बसवून त्यांना पुढील २५ वर्षे मोफत वीज दिली जाणार आहे. महावितरण कंपनीने स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजनेची (स्मार्ट) अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी ६५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ५ लाख ग्राहकांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.
महावितरणने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने ही 'स्मार्ट' योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश १.५४ लाख बीपीएल ग्राहकांचे वीज बिल पूर्णपणे समाप्त करणे हा त्याचप्रमाणे महिन्याला आहे. १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ३.४५ लाख ग्राहकांनाही याचा लाभ होणार आहे.
ही योजना केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना'च्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राहकाला १ किलोवॅट क्षमतेचा सोलर रूफटॉप बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपयांचे अनुदान मिळते, तर उर्वरित खर्च ग्राहकाला करावा लागतो.
स्मार्ट योजनेत केंद्राच्या अनुदानासोबतच राज्य सरकारकडून बीपीएल ग्राहकांना १७,५०० रुपयांची अतिरिक्त सबसिडी देण्यात येईल. त्यामुळे लाभार्थी अत्यंत कमी खर्चात आपल्या घरावर सोलर रूफटॉप बसवू शकतील आणि २५ वर्षे वीज बिलाच्या त्रासातून मुक्त होतील. त्याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीवरून उत्पन्न देखील मिळेल.
१०० युनिटपेक्षा कमी तीज वापरणाऱ्या सामान्य ग्राहकांना राज्य सरकार १० हजार रुपये, तर अनुसूचित जाती/जमाती) ग्राहकांना १५ हजार रुपयांची सबसिडी देईल. केंद्र सरकारकडून मिळणारे ३० हजार रुपयांचे अनुदान देखील यामध्ये राहील.
योजनेला गती देण्याचे निर्देश
महावितरणच्या आढावा बैठकीत या योजनेला गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानामुळे ग्राहकांना अतिशय कमी खर्चात सोलर रूफटॉप बसविणे शक्य होईल.
पीएम आवास योजनेतील लाभार्थ्यांनाही फायदा
महावितरणने जाहीर केले आहे की 'स्मार्ट' योजनेचा लाभ प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनाही दिला जाईल. याअंतर्गत ग्राहक कुठेही सोलर रूफटॉप बसवून ग्रिड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी राहतात, तिथे वीज वापराचा लाभ घेऊ शकतील. नागपूर जिल्ह्यातील ३,६८९ ग्राहकांना याअंतर्गत लाभमिळणार आहे.