योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालांत परीक्षांचा निकाल घटला असून यंदा विद्यार्थ्यांच्या टक्केवारीलादेखील धक्का लागला आहे. ७५ टक्के किंवा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांहून अधिक कमी विद्यार्थ्यांना 'डिस्टिंक्शन' मिळाले आहे. दुसरीकडे नव्वद टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का मात्र कायम आहे. साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी नव्वदीपार झाले आहेत.
२०२३ मध्ये २३.६१ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत होते. तर मागील वर्षी प्रावीण्य विद्यार्थ्यांची टक्केवारी २६.६७इतकी होती. मात्र यावर्षी यात घट झाली आहे. यंदा २७ हजार ४८४ (२०.३८ टक्के) विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. मागील वर्षीच्या तुलनेत ६.२९ टक्के प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी घटले आहेत.
सर्वाधिक प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातनागपूर जिल्ह्यात सर्वाधिक २४.५७ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण तर गोंदिया व वर्धा जिल्ह्यात अनुक्रमे २१.२५ टक्के व १९.५५ टक्के विद्यार्थ्यांना ही श्रेणी मिळाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी ७.५७ टक्के विद्यार्थ्यांना प्रावीण्य श्रेणी मिळाली.
सेकंड क्लासचा सर्वाधिक टक्कामागील वर्षी ३८.१५ टक्के विद्यार्थी ६० टक्के ते ७५ टक्के या प्रथम श्रेणीत होती. यंदा हाच आकडा ३२.०२ इतका आहे. द्वितीय श्रेणीत २६.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते व यावर्षी ४५ टक्के ते ६० टक्के या श्रेणीत ३३.९३ टक्के विद्यार्थी आहेत.
श्रेणीनिहाय टक्केवारीजिल्हा प्रावीण्य श्रेणी प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणीभंडारा १४.७६ २८.३८ ३३.०५चंद्रपूर १२.७४ २८.०७ ३३.२३नागपूर २४.५७ ३१.३४ २८.४५वर्धा १९.५५ २७.३९ २९.५०गडचिरोली ७.५७ २१.९४ ३६.६९गोंदिया २१.२५ ३३.२८ ३०.२१
टक्केनिहाय विद्यार्थीटक्केवारी एकूण % (२०२३) एकूण % (२०२४) एकूण% (२०२५)९० टक्क्यांहून अधिक १.९९ २.५४ २.६३८५-९० ४.४५ ५.२२ ४.१८८०-८५ ७.४४ ८.२६ ५.९९७५-८० ९.७३ १०.६५ ७.५७७०-७५ ११.६९ ११.९४ ८.८८६५-७० १२.६६ १२.५८ १०.१५६०-६५ १४.२७ १३.६३ १२.९९४५-६० २९.०८ २६.८१ ३३.९३
साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी नव्वदीपार२०२१ मध्ये ४.२४ टक्के (६ हजार ७८८) विद्यार्थी २० टक्क्यांहून अधिक गुण घेतलेले होते. २०२२ मध्ये हेच प्रमाण ३.३० टक्क्यांवर (५ हजार १५) पोहोचले. २०२३ केवळ १.९९ टक्के (१ हजार ९८७) विद्यार्थ्यांनाच ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळू शकले होते. मागील वर्षी २.५४ टक्के (३ हजार ६६७) विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते.