शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

महिलांची दिशाभूल करणाऱ्या मंत्रालयाला पहिला नंबर, तर गचके देणारे बांधकाम दुसऱ्या क्रमांकावर

By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2025 18:31 IST

Nagpur : सरकारच्या रिपोर्ट कार्डवर बाळासाहेब थोरात यांची टीका

कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांनी मंत्रालयांचे रिपोर्ट कार्ड सादर करून नंबर दिले आहेत. महिला बालविकास विभागाला पहिला क्रमांक दिला आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचे आश्वासन पूर्ण केले नाही. १५०० चे पण नीट पुर्ण करत नाही. महिलांची दिशाभूल करू शकतो असे दाखवले त्यामुळे या विभागाला पहिला क्रमांक दिला असेल. तर राज्यातील नागरिक रस्त्यांवर गचके खात आहेत. त्यामुळे त्यांना सरकारची आठवण येते म्हणून बांधकाम विभागाला दुसरा क्रमांक दिला असावा, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डवर केली.

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, मी अनेक वर्ष मंत्री राहिलो आहे. त्यामुळे महायुती सरकारचे रेटिंग देण्याचे काय निकष आहेत हे तपासले पाहिजे. सर्वच स्तरावर हे विभाग अपयशी ठरले आहेत. आधार नसलेल्यांना संजय गांधी निराधारचा लाभ दिला जातो. मात्र चार महिने पासून त्यांना पैसे गेले नाही. निराधार लोकांची काळजी घेऊ शकत नाही म्हणजे, कुचकामी सरकार आहे. हे सरकार १०० दिवसात अपयशी ठरले,असा ठपका त्यांनी ठेवला. पिक विमा योजना बंद केली यासाठी कृषी विभागाला तिसरे स्थान दिले आहे. सर्व रस्त्यांवरील एसटी बंद पडलेल्या, खळखळ झालेल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करू शकत नाही प्रवासी हवालदील झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी अपयशी लोकांना पाहिले स्थान देणारा क्रम लावला की काय अशी अशी शंका येते. मंत्रिमंडळाचे जे वातावरण आहे त्याचा सुद्धा परिणाम यावर निकालावर दिसतोय. सामान्य प्रशासन विभागाची खराब कामगिरी दाखवली. याबाबतीत मुख्यमंत्री खरे बोलले, असा चिमटाही त्यांनी घेतला.

नितेश राणे यांचे महान कार्यनितेश राणे यांचे महान कार्य राज्यात सुरू आहे. दोन समाजात भेद कसा निर्माण करता येईल, यावर एकमेव कार्यक्रम ते राबवत असल्यामुळे त्यांना पाचव स्थान दिले असेल, असा टोला थोरात यांनी लगावला.

दोन पवारांमध्ये काय सुरू आहे ?शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही कॅमेऱ्यापुढे जास्त येत असतात. त्यांनाच यावर विचारलं पाहिजे. नेमकं त्यांचं काय सुरू आहे, यावर मला काही सांगता येणार नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर