अभिजात भारतीय संगीताचा वारसा नव्या पिढीच्या हाती सुरक्षित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:09 IST2025-03-24T13:08:35+5:302025-03-24T13:09:16+5:30

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे वितरण

The legacy of classical Indian music is safe in the hands of the new generation said CM Devendra Fadnavis | अभिजात भारतीय संगीताचा वारसा नव्या पिढीच्या हाती सुरक्षित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अभिजात भारतीय संगीताचा वारसा नव्या पिढीच्या हाती सुरक्षित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा नवी पिढी अतिशय सक्षमपणे पुढे नेत असून,  त्यांच्या हाती हा वारसा सुरक्षित आहे या युवा प्रतिभांना शाेधण्याचे व गाैरवान्वित करण्याचे ‘लाेकमत’ परिवाराचे कार्य ऐतिहासिक आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

‘लोकमत’ समूहाद्वारे ‘लाेकमत सखी’च्या संस्थापिका व संगीत साधक ज्याेत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित १२व्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’चे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सूर ज्याेत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराच्या १२ व्या सत्रात ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर यांना लिजेंड अवॉर्ड, प्रख्यात गझल गायक तलत अझीझ यांना आयकॉन अवॉर्ड, शास्त्रीय गायक अनिरुद्ध ऐथल तसेच नव्या पिढीच्या गायिका अंतरा नंदी व अंकिता नंदी यांना युवा प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संगीतामध्ये आजार बरा करण्याची ताकद : विजय दर्डा

भारतीय शास्त्रीय संगीत आजार बरा करू शकते काय, असा प्रश्न नव्या पिढींकडून येत असताे. याचे उत्तर विश्वासदायक आहे. संगीताच्या माध्यमातून ऑपरेशन हाेतात, डिलिव्हरी केली जाते. एवढेच नाही तर संगीतामुळे गायी अधिक दूध देतात. खराेखर संगीतामध्ये आजार बरा करण्याची ताकद आहे, असा विश्वास लाेकमतच्या एडिटाेरियल बाेर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डाॅ. विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केला. बदलत्या काळात भारतीय शास्त्रीय संगीत आपला वारसा विस्मृतीत तर जाणार नाही, असा प्रश्न केला जाताे. मात्र आज भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये विश्वास ठेवणारी नवी पिढी माेठ्या संख्येने पुढे येत आहे. यावरून विश्वासदर्शक स्थिती आहे. याच युवा प्रतिभांना सन्मानित करून प्राेत्साहित करण्याचे काम लाेकमतद्वारे या पुरस्काराच्या माध्यमातून करीत असल्याची भावना डाॅ. दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली.

दिग्गज संगीत प्रेमींची उपस्थिती

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, ‘लाेकमत’च्या एडिटाेरियल बाेर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डाॅ. विजय दर्डा, ‘लाेकमत’चे एडिटर इन चीफ व राज्याचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आ. कृपाल तुमाने, आ. बाळासाहेब मांगूळकर, आ. विकास ठाकरे, आ. ॲड. अभिजित वंजारी, आ.  परिणय फुके, आ. प्रवीण दटके, मेजर जनरल संजयकुमार विद्यार्थी, गार्गी विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेचे सतीश अंभोरे, ‘रचना देवेंद्र दर्डा, पूर्वा दर्डा-कोठारी, सुनीत कोठारी, ज्युरी सदस्य शशी व्यास, ज्युरी सदस्य गौरी यादवाडकर, एनडीआरएफचे पोलिस उपमहानिरीक्षक हरिओम गांधी आदी मान्यवर उपस्थित हाेते. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले. लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी आभार मानले. याचे प्रयोजक सेलो, सहप्रायोजक अदानी समूह, सॉलिटेअर, हॉस्पिटॅलिटी पार्टनर रेडीसन ब्लू व असोसिएट पार्टनर निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्था होते.

उस्ताद शुजात हुसेन खान यांच्या सतारवादनाने भारावले सभागृह

पुरस्कार वितरणानंतर सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद शुजात हुसेन खान यांच्या सतारवादन आणि सुफी गायनाने सभागृहात उपस्थित रसिकांना भारावून साेडले. सतारीवर तालबद्ध व लयबद्धपणे खेळणारी त्यांची बाेटे आणि त्या सतारीतून निघणाऱ्या स्वरतरंगाने प्रेक्षकांच्या कानामनाला तृप्त करणारी अनुभूती दिली. या स्वरलहरी हृदयात खाेलवर जात भर उन्हाळ्यात पावसाचे तरंग उडवीत हाेत्या.

Web Title: The legacy of classical Indian music is safe in the hands of the new generation said CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.