दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
By योगेश पांडे | Updated: May 7, 2024 00:15 IST2024-05-07T00:15:35+5:302024-05-07T00:15:58+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या कारचा सोमवारी अपघात झाला

दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या कारचा सोमवारी अपघात झाला. दारूच्या नशेत कार चालवत समोरून त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात चौधरी यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या. जपानी गार्डनजवळ ही घटना घडली. चौधरी व त्यांच्या पत्नी कारने घरी जात असताना राजभवन चौकाजवळ एका क्वालिसचालकाने दारूच्या नशेत कार विरुद्ध बाजूने आणली व समोरून येत चौधरी यांच्या कारला उजव्या भागात धडक दिली. यात चौधरी यांच्या पत्नीच्या चेहऱ्याला मार लागला. चौधरी यांनी लगेच नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे.