ग्राईंडर मशीनची वायर तुटली, फर्निचर कामगाराच्या आयुष्याची दोरी तुटली

By योगेश पांडे | Updated: July 4, 2023 17:20 IST2023-07-04T17:19:45+5:302023-07-04T17:20:17+5:30

अजनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

The grinder machine's wire snapped, the furniture workers lifeline snapped | ग्राईंडर मशीनची वायर तुटली, फर्निचर कामगाराच्या आयुष्याची दोरी तुटली

ग्राईंडर मशीनची वायर तुटली, फर्निचर कामगाराच्या आयुष्याची दोरी तुटली

नागपूर : ग्राईंडर मशीनची वायर तुटल्याने एका दुकानाच्या फर्निचरचे काम करणाऱ्या तरुण कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुभाष भागीरथ चौधरी (२४, नंदनवन) असे मृतक तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी तो मामा उदाराम चौधरी (४१) यांच्यासोबत मानेवाडा चौकातील सचिन किराड यांच्या घरी कपड्याच्या दुकानाचे फर्निचरचे काम करत होते. काम करत असताना अचानक ग्राईंडर मशीनची वायर तुटली. ती वायर थेट सुभाषला लागली व त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यात तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. उदाराम चौधरी यांच्या सूचनेवरून अजनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The grinder machine's wire snapped, the furniture workers lifeline snapped