गोडाऊन फोडून इलेक्ट्रीक साहित्य केले लंपास
By दयानंद पाईकराव | Updated: August 25, 2023 14:35 IST2023-08-25T14:33:43+5:302023-08-25T14:35:03+5:30
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

गोडाऊन फोडून इलेक्ट्रीक साहित्य केले लंपास
नागपूर : इलेक्ट्रीकचे गोडाऊन फोडून अज्ञात आरोपीने ८३ हजाराचे साहित्य लंपास केले. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ११.२० ते दुपारी १२.३० दरम्यान घडली. दामोदर उर्फ भाऊराव मारोतराव इंगळे (वय ५५, रा. सुदर्शननगर, नरसाळा, हुडकेश्वर) असे फिर्यादीचे नाव आहे.
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेडिकल हॉस्पीटलच्या ट्रामा बिल्डींग मागे दामोदर उर्फ भाऊराव इंगळे यांचे इलेक्ट्रीकल साहित्याचे गोडाऊन आहे. ते गोडाऊनच्या मुख्य दाराला कुलुप लाऊन मिहानमध्ये कामानिमित्त गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या गोडाऊनच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने गोडाऊनमधील इलेक्ट्रीकल्सचे साहित्य किंमत ८३ हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.