शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

निवडणूक आली...‘फेक न्यूज’वर ठेवा ‘वॉच’!

By योगेश पांडे | Updated: March 11, 2024 00:12 IST

कारवाईचे प्रमाण वाढविण्याची गरज : चार वर्षांत केवळ १३ गुन्हे दाखल.

नागपूर : ‘सबकुछ ऑनलाइन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात. मात्र, असे करणे महागात पडू शकते. २०२० पासून नागपूर शहरात अशा प्रकारे ‘फेक न्यूज’ विविध ‘सोशल मीडिया’वर ‘पोस्ट’ करणे अनेकांना महाग पडले. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार चार वर्षांत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. ‘फेक न्यूज’चे एकूण प्रमाण लक्षात घेता गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी आहे. विशेषत: निवडणुकीच्या काळात विविध दावे प्रतिदावे करणाऱ्या फेक न्यूजचा प्रसार वाढेल. अशा स्थितीत प्रशासनाने यावर विशेष लक्ष ठेवून लगेच कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांत ‘स्मार्टफोन्स’ वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांचे नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. याचप्रमाणे अनामिक म्हणूनदेखील अनेकदा खोटे वृत्त विविध ‘प्लॅटफॉर्म्स’वर ‘पोस्ट’ करण्यात येते. एखाद्या परिचिताने पाठविले म्हणून ते इतरांकडूनदेखील समोर ‘फॉरवर्ड’ होते, असे प्रकार दररोज घडत असतात. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो. असे करणाऱ्यांविरोधात ‘आयटी अॅक्ट’मधील कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो. २०२० सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्या व नागपूर पोलिसांनी एकूण १३ प्रकरणांत गुन्हे दाखल केले. २०२० मध्ये ६, २०२१ मध्ये ४, २०२२ मध्ये एक व २०२३ मध्ये दोन गुन्हे दाखल झाले. या कालावधीत २० जणांना अटक करण्यात आली. २०२० मध्ये १४ पुरुष व पाच महिलांना अटक झाली तर २०२२ मध्ये एकाला अटक झाली.

‘फेक प्रोफाईल’वरून शेअर होतात फेक न्यूज‘सोशल मीडिया’वर ‘फेक न्यूज’ शेअर करताना अनेकदा खोट्या प्रोफाईल तयार करण्यात येतात. प्रकाशित झालेल्या न्यूजच्या क्लिपिंगमध्ये एडिटिंग करून किंवा चुकीचा स्क्रीनशॉट काढून अथवा एखाद्या वृत्तपत्र-वाहिनीचा लोगो वापरून खोट्या बातम्या तयार करण्यात येतात.

तक्रारीसाठी लोकच पुढे येत नाहीदररोज विविध ‘प्लॅटफॉर्म’वर ‘फेक न्यूज’ दिसून येतात. यातील काही बातम्या या सामाजिक सौहार्द बिघडविणाऱ्या किंवा समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यादेखील असू शकतात. यासंदर्भात तक्रारीसाठी लोक पुढे येत नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

दाखल झालेले गुन्हेवर्ष : गुन्हे२०१६ : ४२०१७ : २२०१८ : ३२०१९ : ३२०२० : ६२०२१ : ४२०२२ : १२०२३ : २

टॅग्स :nagpurनागपूर