स्वत:च्याच ट्रॅक्टरखाली येऊन चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2023 17:40 IST2023-03-01T17:35:47+5:302023-03-01T17:40:51+5:30

Nagpur News स्वत:च्याच ट्र्रॅक्टरखाली येऊन त्याच्या चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

The driver died after falling under his own tractor | स्वत:च्याच ट्रॅक्टरखाली येऊन चालकाचा मृत्यू

स्वत:च्याच ट्रॅक्टरखाली येऊन चालकाचा मृत्यू

नागपूर : स्वत:च्याच ट्रॅक्टरखाली येऊन त्याच्या चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कमलकांत संगमलाल पाठक (४८, वानाडोंगरी) असे संबंधित चालकाचे नाव आहे.

मंगळवारी पाठकर हे एमएच ३२-पीसी-०३६९ या ट्रॅक्टरने ऐरण गाव ते एसीसी कंपनी या मार्गावरून जात होते. अचानक मार्गावर खड्डे आल्याने त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ते खाली पडले. नेमके त्याच वेळी ट्रॅक्टर खड्ड्यांमुळे रस्त्याच्या खाली उतरले व ते ट्रॅक्टरखालीच गेले. यात ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरील लोकांनी त्यांना उपचारासाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: The driver died after falling under his own tractor