डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून सात वर्ष केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 20:48 IST2022-06-17T20:48:01+5:302022-06-17T20:48:29+5:30

Nagpur News लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरने युवतीचे सात वर्ष शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. युवतीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

The doctor lured her into marriage and raped her for seven years | डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून सात वर्ष केला बलात्कार

डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून सात वर्ष केला बलात्कार

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरने युवतीचे सात वर्ष शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. युवतीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

नागेंद्र रामनारायण पटेल (३५, लोही, गुरह, रिवा मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. नागेंद्र एप्रिल २०१५ मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. पीडित ३१ वर्षाच्या युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार तिची सोशल मीडियावर नागेंद्रसोबत मैत्री झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या जवळ आले. नागेंद्रने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यावेळी नागेंद्र हनुमाननगरात किरायाने राहत होता. त्याने युवतीला आपल्या खोलीवर बोलावले. लग्न करण्याची बतावणी करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर तो नेहमीच तिला बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध करू लागला. नागेंद्रने युवतीला अनेक ठिकाणी नेऊन तिच्याशी शरीरसंबंध केले. लग्नासाठी विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ करीत होता. युवतीने दबाव टाकल्यानंतर नागेंद्रने तिला २० लाख रुपये मागितले. युवतीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिची बदनामी करण्याची धमकी दिली. २४ मेपर्यंत नागेंद्र तिला वासनेची शिकार करीत राहिला. त्यानंतर युवतीने सातत्याने लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर तो फरार झाला. युवतीने अजनी ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. युवतीने सात वर्ष लग्न करण्यासाठी वाट पाहिल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.

................

Web Title: The doctor lured her into marriage and raped her for seven years