शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीची जागा भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीची - भीमराव आंबेडकर

By आनंद डेकाटे | Updated: July 5, 2024 20:51 IST

दीक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करा

नागपूर : दीक्षाभूमीची मालकी ही स्मारक समितीची नाही. समितीकडे केवळ स्मारक बांधण्याचीच जबाबदारी होती. दीक्षाभूमीची जागा ही भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीची असून यासंदर्भातील पुरावेही आमच्याकडे आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, एनआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून याची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्या सुनावणीला मी स्वत: पुराव्यासह हजर राहणार आहे. स्मारक समितीला ‘ब्रीच ऑफ ट्रस्ट’ अंतर्गत दीक्षाभूमी सांभाळायला दिली होती. त्यात अपयशी ठरल्याने धर्मदाय आयुक्तांची भेट घेऊन समितीच बरखास्त करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

दीक्षाभूमीवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भीमराव आंबेडकर यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी परिसरातील ज्या भूमिगत पार्किंगच्या कामाचीही पाहणी केली. त्यानंतर पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली शेवटची क्रांती म्हणजे धम्मक्रांती होय. याच दीक्षाभूमीत त्यांनी ती ऐतिहासिक क्रांती केली. त्यामुळे त्याची छेडखानी आम्ही होऊ देणार नाही.

स्मारक समितीतील लोक मग्रुर आहेत. लोकांशी संवाद साधत नाही. दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगला येथील खोदकामाला अनेक दिवसांपासून लोकांचा विरोध होता. परंतु कुणी ऐकायलाच तयार झाले नाही. त्यामुळे लोकांनी आंदोलन केले. आंदोलन शांततेत सुरू होते. परंतु, राजकीय पक्षाचे नेते असलेल्या समिती सदस्यांच्या कार्यकर्त्यांनीच जाळपोळ करून वातावरण खराब केल्याचा आरोपही भीमराव आंबेडकर यांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे पद्माकर गणवीर, भीमराव फुसे, वंचित बहुजन आघाडीचे राहुल दहीकर आदी उपस्थित होते.

भूमिगत पार्किंग मोठ्या षडयंत्राचा भागदीक्षाभूमीवर ओबीसींसह अल्पसंख्याक समाजही मोठ्या संख्येने धम्मचक्र प्रवर्तन दिनी हजेरी लावतात. ती संख्या कमी करण्यासाठी षड्यंत्र रचून भूमिगत पार्किंगचा घाट रचला जात आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनी लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. नुकत्याच हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे तर घडवायची नाही ना? अशी शंकाही भीमराव आंबेडकर यांनी उपस्थित केली.

- भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या, जागा पूर्ववत करा१ जुलै रोजी दीक्षाभूमीवर झालेले आंदोलन हे उत्स्फुर्त होते, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लावलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे. तसेच येथील खोदकाम केलेली जागा तातडीने पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणीही भीमराव आंबेडकर यांनी केली. दीक्षाभूमीवरील जागा १५ दिवसात पूर्ववत समतल न केल्यास स्मारक समितीच्याविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी