रेल्वेच्या धडकेत संत्रा विकणाऱ्या युवकाचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: March 20, 2023 14:43 IST2023-03-20T14:43:05+5:302023-03-20T14:43:29+5:30
जरीपटका पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद

रेल्वेच्या धडकेत संत्रा विकणाऱ्या युवकाचा मृत्यू
नागपूर : अज्ञात रेल्वेगाडीने धडक दिल्यामुळे संत्रा विकणाºया युवकाचा मृत्यू झाल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. राहुल दामोदर सुर्यवंशी (२७, बोरकुआ, इंदोर, मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो रेल्वेस्थानकावर संत्रा विकण्याचे काम करीत होता.
रविवारी दुपारी १.३० वाजता दिल्ली-नागपूर रेल्वे लाईनवर मंगळवारी ओव्हरब्रीजजवळ अज्ञात रेल्वेगाडीने त्याला धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. संतोष चौथीराम प्रजापती (४२, मंगळवारी गोवा कॉलनी) यांनी दिलेल्या सुचनेवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.