घराच्या बांधकामासाठी आणलेले इलेक्ट्रीक वायरचे बंडल पळविले
By दयानंद पाईकराव | Updated: May 29, 2023 14:12 IST2023-05-29T14:11:58+5:302023-05-29T14:12:51+5:30
ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली

घराच्या बांधकामासाठी आणलेले इलेक्ट्रीक वायरचे बंडल पळविले
नागपूर : घराच्या बांधकामासाठी आणलेले ईलेक्ट्रीक वायरचे ७२ हजार रुपये किमतीचे बंडल अज्ञात आरोपीने चोरी केले. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० ते २७ मे दरम्यान घडली आहे.
सुजल निलेश आखरे (वय ३५, रा. गंगाविहार नं. २, पिपळा रोड, हुडकेश्वर) यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. बांधकामासाठी त्यांनी इलेक्ट्रीक वायरचे बंडल आणून ठेवले होते. त्यापेकी काही बंडल वापरून त्यांनी घराचे डिझाईन बदलायचे असल्यामुळे उरलेले बंडल स्टोअर रुममध्ये ठेवले होते.
काही दिवस घराचे बांधकाम बंद होते. शनिवारी २७ मे रोजी त्यांनी स्टोअर रुममधील बंडल बघितले असता त्यांना बंडल दिसले नाही. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.