शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला अन्...; पारडीत मजुराची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 01:36 IST

किरकोळ कारणावरून शुक्रवारी रात्री त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला अन् या गुन्हेगाराने एका मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.

नागपूर - लकडगंज-कळमना भागात त्याची १५ वर्षांपूर्वी प्रचंड दहशत होती. मात्र सततच्या कारवाईमुळे त्याने गुन्हेगारी सोडली अन् मिळेल ते काम करून तो जगू लागला. मात्र... किरकोळ कारणावरून शुक्रवारी रात्री त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला अन् या गुन्हेगाराने एका मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. पारडी चाैकात भल्या सकाळी शनिवारी ही घटना उघडकीस आली अन् त्यानंतरच्या घटनाक्रमातून गुन्हेगारी सोडलेल्या आरोपीची क्रूरताही पुढे आली. दामोदर मनोहरराव दासरथिवार (वय ४५) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

१५ वर्षांपूर्वी दामोदरची लकडगंज, शांतीनगर, पारडी, कळमना आणि आजूबाजूच्या भागात मोठी दहशत होती. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हेही दाखल आहेत. त्यावेळी पोलिसांनी विविध गुन्ह्यात कठोर कारवाई करून त्याची नांगी ठेचली. वारंवार पोलीस कोठडी आणि कारागृहात राहावे लागत असल्याने त्याने गुन्हेगारीपासून फारकत घेतली. अलीकडच्या काही वर्षांत मोलमजुरी करून तो गुजराण करू लागला. दिवसा कमवायचे, दारू प्यायची, मिळेल ते खायचे आणि जागा दिसेल तेथे झोपायचे, असा त्याचा दिनक्रम बनला. शुक्रवारी धुळवडीच्या दिवशी असेच झाले. त्याने रात्रीपर्यंत दारू ढोसली अन् पारडी चाैकातील एका मेडिकल स्टोअर्सच्या शटरसमोर झोपला. त्याच जागी सोनू कांशिराम बंसकर (वय ४०) गादी टाकून नेहमी रात्री झोपत होता. त्या जागी दामोदर झोपल्याचे पाहून सोनूने त्याला उठवले. 

यावेळी दोघांत वाद झाला. दोघेही दारूच्या नशेत टुन्न होते. एकमेकांना मारहाण केल्यानंतर दामोदर तेथून उठून बाजूच्या गिट्टीच्या ढिगाऱ्यावर जाऊन झोपला. गिट्टी अंगाला टोचत असल्याने त्याला काही झोप येत नव्हती. आपल्याला भर झोपेतून हाकलून लावल्याचा राग त्याच्या डोक्यात होता. पहाटे ५ च्या सुमारास त्याच्यातील गुन्हेगार जागा झाला. बाजूला पडून असलेले गट्टू (सिमेंटची वीट) उचलून त्याने सोनूला ठेचणे सुरू केले. १० ते १५ वेळा डोक्यावर वीट मारून सोनूला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पळून गेला. दरम्यान, शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाने माहिती कळविताच पारडी पोलीस ठाण्याचा ताफा घटनास्थळी धावला. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्यासह गुन्हे शाखेचाही ताफा पोहोचला.

अखेर ओळख पटली अन् ...मृतक त्या भागात मोलमजुरी करून आपले पोट भरत होता. त्याचे नाव, गाव, पत्ता कुणाला माहीत नव्हता. ठिय्यावर मजुरी करणाऱ्या काही मजुरांसोबत तो बोलायचा, या माहितीवरून पोलिसांनी त्याची माहिती मिळवली. तो मूळचा ईटारसी मध्य प्रदेशमधील असल्याचे कळले. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक मुकुंद साळुंखे, एपीआय रियाज मुलानी, संकेत चाैधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी दामोदरची माहिती काढली. तो पारडी नाका नंबर पाचमधील एका दारूच्या भट्टीवर असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पारडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस