शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

शेतमालांची 'एमएसपी' कृषी विभाग जाहीर करते मग संस्थांकडून ओलाव्याची अट का?

By सुनील चरपे | Updated: September 2, 2025 17:27 IST

Nagpur : अधिक ओलावा असल्यास एमएसपीपेक्षा कमी दर मिळत असल्याने हा ओलावा एमएसपी दरात अडसर ठरत आहे. या ओलाव्याच्या अटीबाबत कृषी विभाग अनभिज्ञ आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारचा कृषी विभाग २४ शेतमालांची 'एमएसपी' जाहीर करीत असून, त्यात ओलावा ग्राह्य धरला जात नाही. यातील केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या काही संस्था शेतमाल एमएसपी दराने खरेदी करताना विशिष्ट ओलाव्याची अट घालतात. अधिक ओलावा असल्यास एमएसपीपेक्षा कमी दर मिळत असल्याने हा ओलावा एमएसपी दरात अडसर ठरत आहे. या ओलाव्याच्या अटीबाबत कृषी विभाग अनभिज्ञ आहे.

एमएसपी दराने सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची खरेदी नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या संस्था करीत असून, गहू व तांदळाची खरेदी याच विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एफसीआयकडून केली जाते. कापसाची खरेदी केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सीसीआयकडून केली जाते. सोपा (सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया) ही एकमेव खासगी संस्था सोयाबीनची मोठी खरेदीदार आहे. कापूस वगळता राज्य सरकारचा पणन विभाग या शेतमालाची खरेदी करीत असून, कापसाची खरेदी पूर्वी कापूस पणन महासंघ करायचा. या सर्व संस्थांचे शेतमाल खरेदीचे व त्यातील ओलाव्याचे वेगवेगळे निकष आहेत. शेतमालाची एमएसपी ही त्यांच्या वाजवी सरासरी गुणवत्ता (एफएक्यू) यावर आधारित असली तरी याच संस्था शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करतेवेळी अधिक ओलावा, एमएसपीपेक्षा कमी दर या आधारावर ओलाव्याचे निकष लावत असल्याने यात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

डाळवर्गीय पिकांच्या खरेदीचे निकष

  • ओलावा - १२ टक्के
  • इतर पदार्थ - २ टक्के
  • कचरा - ३ टक्के
  • खराब दाणे - ३ टक्के
  • अर्धवट खराब दाणे - ४ टक्के
  • अपक्च दाणे - ३ टक्के
  • फुटलेले व टोचलेले दाणे - ४ टक्के

 

सीसीआयचे कापूस खरेदी निकष (ओलावा)

  • ८ टक्के - ७,५२१ रुपये
  • ९ टक्के - ७,४४५ रुपये
  • १० टक्के - ७,३७० रुपये
  • ११ टक्के - ७,२९५ रुपये
  • १२ टक्के - ७,२२० रुपये

 

सरकारी संस्थांचे निकष

  • ओलावा - १२%
  • इतर पदार्थ - २%
  • अपक्व दाणे - ५%
  • फुटलेले व टोचलेले दाणे - ३%
  • मशीनमध्ये फुटलेले दाणे - १५%

 

'सोपा'चे सोयाबीन खरेदी निकष

  • ओलावा - १० टक्के
  • इतर पदार्थ - २ टक्के
  • खराब दाणे - २ टक्के
  • हिरवे दाणे - ४ टक्के
  • छोट्या आकाराचे दाणे - ८ टक्के

 

"शेतकऱ्यांचा वाजवी सरासरी गुणवत्ता (एफएक्यू) यावर आधारित एमएसपीला विरोध नाही. पण, त्यांनी उत्पादित केलेल्या किंवा बाजारात विकायला आणलेल्या शेतमालाची एमएसपी ही त्यातील ओलाव्यानुसार माहीत असायला हवी. याची माहिती शेतकऱ्यांना द्यायला हवी."- मिलिंद दामले, अध्यक्ष, शेतकरी संघटना, तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडी, महाराष्ट्र.

 

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरीfarmingशेतीSoybeanसोयाबीनcottonकापूस