हॉटेलच्या महिला मॅनेजरशी अश्लील टॉक, सव्वा दोन वर्षांनंतर आरोपीला अटक
By योगेश पांडे | Updated: April 2, 2024 22:28 IST2024-04-02T22:27:27+5:302024-04-02T22:28:24+5:30
नागपूर : सदरमधील एका हॉटेलमधील महिला मॅनेजरला फोन करून अश्लील संभाषण करणाऱ्या आरोपीला तब्बल सव्वा दोन वर्षांनंतर अटक करण्यात ...

हॉटेलच्या महिला मॅनेजरशी अश्लील टॉक, सव्वा दोन वर्षांनंतर आरोपीला अटक
नागपूर: सदरमधील एका हॉटेलमधील महिला मॅनेजरला फोन करून अश्लील संभाषण करणाऱ्या आरोपीला तब्बल सव्वा दोन वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीने महिलेला दोन आठवडे त्रास दिला होता. ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आली.
संबंधित महिला हॉटेल व्यवस्थापक असल्याने ती फोन रिसीव्ह करायची. ३० डिसेंबर २०२१ ते १२ जानेवारी २०२२ या कालावधीत आरोपी प्रभाकर अनिरुद्ध पंडित (३७), गौसिया कॉलनी, उमरेड मार्ग याने तेथे फोन करून तिच्याशी अश्लील संभाषण करत त्रास दिला. तो तिला वारंवार कॉल करायचा व एसएमएसदेखील करायचा. तिने अखेर तक्रार केली व सदर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरारच होता.
पोलिसांना ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून प्रभाकरचा पत्ता मिळाला. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे, अरुण क्षीरसागर, नीलेश घोघरे, मिलिंद भगत, सतीश गाऊत्रे, राजेश गिरडकर, आशिष बहाळ, सचिन कावळे, पंकज त्रिपाठी, नीता समरीतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.