दिल्ली विमानतळावर उड्डाणांसाठी बदलले टर्मिनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:00 AM2018-03-18T00:00:00+5:302018-03-18T00:00:17+5:30

खराब पीडब्ल्यू इंजिन असलेल्या ए-३२० नियो श्रेणीतील अनेक विमाने उड्डाणातून हटविल्यानंतर, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक उड्डाणाकरिता टर्मिनलमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणाऱ्या उड्डाणांवर होणार आहे.

Terminal changed for flight in Delhi airport | दिल्ली विमानतळावर उड्डाणांसाठी बदलले टर्मिनल

दिल्ली विमानतळावर उड्डाणांसाठी बदलले टर्मिनल

Next
ठळक मुद्दे प्रवास होणार महाग : शटल बसचे शुल्क लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खराब पीडब्ल्यू इंजिन असलेल्या ए-३२० नियो श्रेणीतील अनेक विमाने उड्डाणातून हटविल्यानंतर, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक उड्डाणाकरिता टर्मिनलमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणाऱ्या उड्डाणांवर होणार आहे.
नागपुरातून दिल्लीला रवाना होणारे इंडिगोचे सर्व प्रवासी आता २५ मार्चपासून दिल्ली विमानतळाच्या दोन क्रमांकाच्या टर्मिनलवर (टी-२) पोहोचणार आहे. या बदलासाठी प्रवासी जबाबदार नाहीत, पण त्यांना अतिरिक्त ३० रुपये शुल्क अदा करावे लागेल. प्रवाशांना एक टर्मिनलपासून दुसऱ्या  टर्मिनलवर नेण्यासाठी शटल बसचा उपयोग करण्यात येईल. इंडिगोव्यतिरिक्त गो-एअर व अन्य विमान कंपन्यांच्या प्रवाशांनाही टर्मिनल बदलावे लागणार आहे. शटल बसच्या शुल्कासह प्रवाशांना विमानतळाबाहेर येण्यासाठी जास्त वेळ लागेल. नागपूर-दिल्ली प्रवास करणाऱ्यांना २५ मार्चपर्यंत टी-१ टर्मिनल उपलब्ध आहे.
नागपूर-दिल्ली नवीन विमानसेवा
गो-एअरची नागपूर-दिल्ली-नागपूर नवीन विमानसेवा २५ मार्चपासून सुरू होणार आहे. ही सेवा १५ एप्रिलपर्यंत सुरू राहील.

Web Title: Terminal changed for flight in Delhi airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.