दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ पर्यंत भरता येईल परीक्षा फॉर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:30+5:302021-01-13T04:17:30+5:30

- अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाला पुन्हा एक संधी नागपूर : केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने अकरावीत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाही, ...

Tenth grade students can fill up to 25 exam forms | दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ पर्यंत भरता येईल परीक्षा फॉर्म

दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ पर्यंत भरता येईल परीक्षा फॉर्म

- अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाला पुन्हा एक संधी

नागपूर : केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने अकरावीत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाही, त्यांना पुन्हा एक संधी दिली आहे. आतापर्यंत अकरावीच्या प्रवेशाच्या नियमित तीन फेऱ्या व दोन विशेष फेऱ्या झाल्या आहेत. १३ ते ३० जानेवारीदरम्यान राबविण्यात येणारी फेरी ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अकरावीत प्रवेश घेतले नाही, कुठल्याही फेरीत ते सहभागी झाले नाही, ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द केले, डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या सप्लीमेंटरी परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. यासाठी समितीने सात श्रेणी पाडल्या आहेत. प्रत्येक श्रेणीत प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक दिले आहे.

Web Title: Tenth grade students can fill up to 25 exam forms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.