पुण्यातून नागपुरात येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:27 IST2019-04-02T23:26:00+5:302019-04-02T23:27:40+5:30

इंडिगो एअरलाईन्सचे पुण्यावरून नागपुरात येणारे विमान मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर पुन्हा पुण्यात परतले. विमानाला सुरक्षित उतरविण्यात आले आणि तांत्रिक चमूच्या तपासणीनंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.

Technical failure in the aircraft coming from Pune to Nagpur | पुण्यातून नागपुरात येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड

पुण्यातून नागपुरात येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड

ठळक मुद्दे उड्डाण रद्द : प्रवाशी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिगो एअरलाईन्सचे पुण्यावरून नागपुरात येणारे विमान मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर पुन्हा पुण्यात परतले. विमानाला सुरक्षित उतरविण्यात आले आणि तांत्रिक चमूच्या तपासणीनंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.
विमान रद्द झाल्यामुळे नागपुरात येणाऱ्या प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागला. अन्य विमानाने त्यांना नागपुरात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे विमान सकाळी ११.१५ वाजता पुण्यातून उड्डाण भरून दुपारी १२.३० वाजता नागपुरात पोहोचते. हेच विमान नागपुरातून १ वाजता दिल्लीकडे रवाना होते. विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अन्य विमानाने दुपारी २.३० वाजता दिल्लीला पाठविण्यात आले.

Web Title: Technical failure in the aircraft coming from Pune to Nagpur