थर्ड लाईन वर्कमुळे टाटानगर - इतवारी - टाटानगर रद्द; अनेक गाड्या विलंबाने धावणार
By नरेश डोंगरे | Updated: February 3, 2024 21:18 IST2024-02-03T21:18:20+5:302024-02-03T21:18:35+5:30
दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर रेल्वे विभागात थर्ड लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे.

थर्ड लाईन वर्कमुळे टाटानगर - इतवारी - टाटानगर रद्द; अनेक गाड्या विलंबाने धावणार
नागपूर : दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर रेल्वे विभागात थर्ड लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूरपर्यंत धावणाऱ्या टाटानगर - इतवारी - टाटानगर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, अनेक गाड्या विलंबाने चालविल्या जाणार आहेत.
दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर रेल्वे विभागात राऊरकेला झारसगुडा सेक्शन दरम्यान थर्ड लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे त्या भागात ७ फेब्रुवारी २०२४ ला ६ तासांसाठी ट्रॅफिक कम पॉवर ब्लॉक केला जाणार आहे. परिणामी या मार्गाने धावणाऱ्या टाटानगर - इतवारी - तसेच इतवारी - टाटानगर या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, ६ फेब्रुवारीला चालणारी १२२६१ मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस मुंबई स्थानकातून ३ तास ४५ मिनिटे विलंबाने प्रवासाला निघणार आहे. अशाच प्रकारे ६ फेब्रुवारीला कुर्ला येथून निघणारी कुर्ला कामाख्या एक्सप्रेस ६ तास विलंबाने प्रवासाला निघेल.
६ फेब्रुवारीला राजेंद्रनगरातून निघणारी १३२८८ दुर्ग साऊथ बिहार एक्सप्रेस राजेंद्रनगर स्थानकातून ३ तास विलंबाने निघेल. ७ फेब्रुवारीला दुर्ग स्थानकातून निघणारी १३२८७ दुर्ग साऊथ बिहार एक्सप्रेस ३ तास विलंबाने प्रवासाला निघेल. ६ फेब्रुवारीला धावणारी १८४७८ योग नगरी ऋषीकेश पुरी उत्कल एक्सप्रेस ३ तास १५ मिनिटे विलंबाने प्रवासाला निघणार आहे.