शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

उद्दीष्ट पन्नास हजार, वाटप झाले सात हजार!

By गणेश हुड | Updated: May 13, 2024 15:49 IST

Nagpur : झोपडपट्टी मालकी पट्टे वितरणाला गती येईना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील पात्र झोपडपट्टीवासियांना त्यांच्या घराच्या जमिनीचा भाडे पट्टा देण्याची महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारने सन २०१७ पासून अंमलात आणली आहे. ५०  हजार पट्टे वाटपाचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले असताना सात वर्षात जवळपास सात हजारच मालकी पट्ट्यांचे वितरण झाले आहे.

शासनाच्या ज्या विभागाच्या जमिनीवर झोपडपट्टी असेल त्याच विभागावर संबंधितांना पट्टे वितरित करण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय  नझूल विभागातर्फे भाडे पट्टा वाटपाचे काम सुरू आहे. या तिन्ही विभागापैकी सरकारी- नझूलच्या जमिनीवर सर्वाधिक झोपडपट्टी वसाहती असूनही याच विभागाचे पट्टे वाटप सर्वात कमी झालेले आहे. एप्रिल २०२४ अखेरीस नासुप्रतर्फे सर्वाधिक ४८३० भाडेपट्ट्यांचे वितरण झाले असून त्या खालोखाल मनपातर्फे १९२१  पट्ट्यांचे वितरण झोपडपट्टीधारकास करून त्यांचे पट्टे पंजीबद्ध करण्यात आलेले आहेत. या दोन्ही विभागांचे मिळून ६७७१ पट्ट्यांचे वितरण झाले. मात्र नझूल मधील पट्ट्यांची संख्या हजारापर्यंतही पोहोचलेली नाही. नासुप्रच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांमध्ये १००६४ घरे असून त्यापैकी ४८३०  झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप झालेले आहे. प्रन्यासच्या विभाग निहाय पट्टे वाटपात सर्वाधिक पट्टे वाटप दक्षिण मध्ये २९६३ इतके झाले आहे. पूर्व-१४४८, उत्तर -३२० तर पश्चिम – ९९अशी स्थिती आहे. पश्चिम मधील प्रन्यासच्या झोपडपट्ट्या झुडपी जंगलाच्या आरक्षणात अडकल्यामुळे तेथील पट्टेवाटप ठप्प आहे. 

मनपाच्या जमिनीवरील १६ झोपडपट्टी वसाहतीत ४८६५ घरे असून त्या पैकी १९२१ झोपडीधारकास पंजीबद्ध भाडेपट्टा करून देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत नझूल विभागाचे पट्टे वाटप मात्र सर्वात संथ आहे. 

पट्टे वाटपास गती मिळावी नागपुरातील झोपडपट्टीवासियांना डिसेंबर २०२३पर्यंत मालकी पट्टे वितरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु, अजूनपर्यंत सर्वत्र पट्टे वाटप सुरू झालेले नाही. खाजगी जमिनीवरील झोपडपट्ट्यात ही प्रक्रियाच ठप्प आहे, तर नझूलचे पट्टे वाटप अडले आहे. पट्टे वाटपातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करून पट्टे वाटपास गती देण्याची गरज आहे. - अनिल वासनिक,संयोजक, शहर विकास मंच, नागपूर

टॅग्स :nagpurनागपूर