नागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:03 IST2018-08-21T18:02:54+5:302018-08-21T18:03:58+5:30
बनावट कागदपत्राच्या आधारे एका त्रिकुटाने बँकेला २१ लाख रुपयांचा गंडा घातला. कमलेश राजकुमार तिवारी (वय ४३), करण राजकुमार तिवारी (वय ३८, दोघेही रा. प्रेरणानगर) आणि प्रदीप बाजीराव काळे (वय ३४, रा. हनुमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत.

नागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्राच्या आधारे एका त्रिकुटाने बँकेला २१ लाख रुपयांचा गंडा घातला. कमलेश राजकुमार तिवारी (वय ४३), करण राजकुमार तिवारी (वय ३८, दोघेही रा. प्रेरणानगर) आणि प्रदीप बाजीराव काळे (वय ३४, रा. हनुमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी १ फेब्रुवारी २०१२ ते १ मार्च २०१३ या कालावधीत खसरा क्रमांक ६१/ १६३ मधील १४ क्रमांकाचा भूखंड आणि त्यावर करण्यात आलेल्या बांधकामाचे बनावट विक्रीपत्र तयार केले. हे विक्रीपत्र बँक आॅफ इंडियाच्या दिघोरी शाखेत गहाण ठेवले आणि बँकेतून २१ लाखांचे कर्ज उचलले. या रकमेची आपसात वाटणी करून आरोपींनी कर्जाच्या रकमेची परतफेड न करता बँकेची फसवणूक केली. पाच वर्षांनंतर ही बनवाबनवी उघडकीस आली. त्यामुळे बँकेतर्फे राजेश गंगाधर सोनकुसरे (वय ५३, रा. मनीषनगर) यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून सोमवारी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.