कर्ज काढून सिमेंट रस्ते ! मनपा २०० कोटींचे कर्ज घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:35 PM2019-02-19T23:35:45+5:302019-02-19T23:37:18+5:30

१५० कोटींचे विशेष अनुदान दिल्यानंतर राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ केली. त्यानंतरही विकास कामांसाठी कर्ज घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सिमेंट रस्त्यांसाठी बॅक ऑफ महराष्ट्रकडून ९.७५ टक्के व्याज दराने २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

Taking debt for Cement road ! NMC will take loan of 200 crores | कर्ज काढून सिमेंट रस्ते ! मनपा २०० कोटींचे कर्ज घेणार

कर्ज काढून सिमेंट रस्ते ! मनपा २०० कोटींचे कर्ज घेणार

Next
ठळक मुद्देअमृत,मेट्रो मॉलचे निर्माण करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १५० कोटींचे विशेष अनुदान दिल्यानंतर राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ केली. त्यानंतरही विकास कामांसाठी कर्ज घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सिमेंट रस्त्यांसाठी बॅक ऑफ महराष्ट्रकडून ९.७५ टक्के व्याज दराने २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
प्रस्तावानुसार शहरातील सिमेंट रस्त्यांच्या टप्पा -२ व टप्पा-३ मधील कामे करण्यासाठी १२८ कोटी उपलब्ध केले जातील. तसेच पाणीपुरवटा योजना ‘अमृत’, मेट्रो मॉल, बुधवार बाजार, सक्करदरा बाजाराचा विकास करण्यासाठी कर्जातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. विशेष म्हणजे कर्ज घेताना करण्यात आलेल्या करारानुसार ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले जाईल. त्याच प्रकल्पावर ही रक्कम खर्च करावयाची आहे. या कर्जासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारची हमी घेण्याची गरज नाही. यासाठी महापालिका व बॅक ऑफ महाराष्ट्र यांच्यात एस्क्रो खात्यासाठी करार कराण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनातर्फे कर्ज घेण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू आहे. अखेर डिसेंबर २०१८ मध्ये बॅक ऑफ महाराष्ट्र यांच्याशी करार करण्यात आला. व्याज दरात कपात करावी यासाठी चर्चा सुरू होती. परंतु बँक निर्धारित व्याज दर कमी करण्यास राजी झालेली नाही. त्यामुळे निर्धारित दराने व्याज द्यावे लागणार आहे.
सौर ऊर्जेवर भर
महापालिकेच्या ज्या इमारतीत मीटरनिहाय एक किलोवॅट वा त्याहून अधिक वीज वापर आहे. अशा इमारती वा कार्यालयात सौर ऊर्जा संयत्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पाणीपुरवठा केंद्रातही सौरऊ र्जेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च होणाऱ्या वीज बचतीतून केला जाणार आहे. यात सौरऊ र्जा संयत्र उपलब्ध करणे, लावणे, कार्यान्वित करणे, आदी कामे २४० महिन्यात परतफेडीच्या आधारावर उभारण्यात येणार आहे. यासाठी शर्ती व अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Taking debt for Cement road ! NMC will take loan of 200 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.