उर्सच्या आधी बदलणार ताजाबादचा चेहरामोहरा
By Admin | Updated: August 10, 2015 02:52 IST2015-08-10T02:52:05+5:302015-08-10T02:52:05+5:30
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ताजाबाद शरीफचा चेहरामोहरा उर्सच्या आधी बदलणार आहे. येथे सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यात आली

उर्सच्या आधी बदलणार ताजाबादचा चेहरामोहरा
विकासाला गती : राज्य शासनाने दिले १३२ कोटी
राघवेंद्र तिवारी नागपूर
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ताजाबाद शरीफचा चेहरामोहरा उर्सच्या आधी बदलणार आहे. येथे सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यात आली असून या विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात ठरविलेली कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. हजरत बाबा ताजुद्दीन औलिया ट्रस्टचे अध्यक्ष हाजी शेख हुसेन यांनी सांगितले की, योजनेच्या पहिल्या टप्प्यात हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या दरगाहजवळ आठ एकरवर ही विकासकामे होणार आहेत. सपाटीकरण, सौंदर्यीकरण, कॉरीडोरची निर्मिती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, लंगर, भव्य द्वार, मुख्यद्वाराचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. सध्या ताजाबाद शरीफच्या जवळच्या परिसर सपाट करण्यात येत आहे. विकासकामांसाठी राज्य शासनाने १३२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यात ८० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून कामाचे वाटपही करण्यात आले आहे.
दगडांची सुरक्षा भिंत
बाबा ताजुद्दीनच्या दरगाह, दुधिया विहिर, लंगरखाना, मस्जिद, परचम आणि मुख्य स्थानांच्या सभोवतालची सुरक्षा भिंत जेसमलेरच्या पिवळ्या बलुवा दगडापासून तयार करण्यात येत आहे. भिंतीची उंची जमिनीपासून साडेचार फूट आणि खांबांची उंची पाच फूट राहणार आहे.
दुरूनच दिसणार दरबार
ट्रस्टचे सचिव इकबाल वेलची यांच्या मते या योजनेत उमरेड रोडवरूनच भाविकांना बाबा ताज यांचा दरबार दिसावा, अशी योजना आहे. या परिसरात प्रत्येक ठिकाणी हिरवेगार वृक्ष लावण्यात येणार आहेत.
चार भव्य प्रवेशद्वार
ट्रस्टचे कोषाध्यक्ष अॅड. व्ही. के. फ्रान्सिस यांच्या मते दरगाहजवळ पोहोचण्यासाठी चार भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. यातील एक द्वार उमरेड रोडच्या दिशेत राहील. दुसरे द्वार आशीर्वादनगरकडे राहील. अनेक भाविक धार्मिक मान्यतेनुसार ताजुद्दीन बाबांच्या पायाकडून प्रवेशाला पसंती देतात. माहितीनुसार बाबांच्या कब्रमध्ये त्यांचे डोके उत्तरेकडे तर पाय दक्षिणेकडे आहेत. त्यामुळे एक भव्य द्वार दक्षिणेकडे उभारण्यात येईल. एक द्वार मेळा मैदानाकडे राहील तर चौथे द्वार पश्चिम दिशेकडे मस्जिदजवळ राहील.
दुधिया विहिरीजवळ शॉवर
बाबा ताजुद्दीन यांच्याशी निगडित पवित्र दुधिया विहीर भाविकांसाठी महत्त्वाची आहे. या विहिरीत आंघोळ केल्यानंतर आजार दूर होतात. त्यामुळे या विहिरीजवळ स्त्री-पुरुषांसाठी शॉवरची सुविधा करण्यात येणार आहे. विहिरीत आघोळ करण्यापूर्वी भाविक शॉवरने आंघोळ करतील.
भव्य लंगरखाना
बाबा ताजुद्दीन यांच्या दरबारात दर गुरुवारी छब्बीसवीला आणि उर्सच्या वेळी नियोजन वितरित करण्यात येते. त्यासाठी दरगाहच्या पश्चिम उत्तर दिशेला एक लंगरखाना तयार करण्यात आला आहे. सात हजार चौरसफूटातील या लंगरखान्यात अडीच हजार भाविक एकाच वेळी भोजन करू शकतील. येथे एक भव्य स्वयंपाकघरही तयार करण्यात आले आहे.
विकास योजनेसाठी १३२ कोटी
पर्यटनाच्या रूपाने विकसित करण्यासाठी संपूर्ण योजनेसाठी खर्च १३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही योजना तीन टप्प्यात पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे.शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी ८ कोटी, दरबाराच्या सौंदर्यीकरणासाठी ३६ कोटी, लंगरखाना, शौचालय, पादत्राणे यासाठी ११ कोटीचा प्रस्ताव आहे. याशिवाय आणखी १० कोटींची कामे होणार आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरूहोणार आहे.
ऐतिहासिक परचम काढणार नाही
योजनेत सर्व स्थळात बदल करण्यात येत आहे. परंतु बाबा ताज दरबार आणि बाबा ताज यांच्यातर्फे स्थापन करण्यात आलेला परचम काढण्यात येणार नाही.