नागपुरात जुगार वादात तडीपार गुंडाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:19 AM2020-06-18T01:19:03+5:302020-06-18T01:21:44+5:30

कळमनाच्या पुनापूर रोडवर भरतवाडा बायपासवर कुख्यात तडीपार गुंडाची तलवारीने हल्ला करीत हत्या करण्यात आली. पाच-सहा आरोपींनी बुधवारी दुपारी त्याची हत्या केली.

Tadipar goon killed in gambling dispute in Nagpur | नागपुरात जुगार वादात तडीपार गुंडाची हत्या

नागपुरात जुगार वादात तडीपार गुंडाची हत्या

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कळमनाच्या पुनापूर रोडवर भरतवाडा बायपासवर कुख्यात तडीपार गुंडाची तलवारीने हल्ला करीत हत्या करण्यात आली. पाच-सहा आरोपींनी बुधवारी दुपारी त्याची हत्या केली. मृताचे नाव नितेश मूलचंद पटले (२८) असून तो कळमना, जामनगर येथील निवासी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नितेशचे त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीसोबत भांडण सुरू होते व यातूनच त्याचा गेम करण्यात आल्याची शक्यता आहे. या हत्याकांडात कुख्यात लोकेश गँगचा हात असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितेशविरोधात शहरातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मे २०१९ मध्ये त्याला स्थानबद्ध करण्यात आले. सध्या तो कन्हान येथे राहत होता. मात्र येथेही त्याने एका तरुणाची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी दुपारच्या दरम्यान भरतवाडा बायपासवर लोकेशसोबत तो जुगार खेळत होता. यादरम्यान भांडण झाले आणि लोकेश व सहकाऱ्यांनी त्याची हत्या केली. या प्रकरणात कळमना पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Tadipar goon killed in gambling dispute in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.