नात्यांची हळवी गुंफण - गोष्ट घराकडील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:29 IST2018-03-30T23:29:02+5:302018-03-30T23:29:13+5:30
वडील आणि मुलगा, दोन पिढ्या आणि दोन भिन्न विचार. यातून होणारी मानसिक कुचंबणा, बदलणारे नात्यांचे संदर्भ आणि त्या नात्यांमधील भावनांची हळवी गुंफण याचे सुंदर सादरीकरण गोष्ट घराकडील या नाटकात प्रेक्षकांनी अनुभवले.

नात्यांची हळवी गुंफण - गोष्ट घराकडील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडील आणि मुलगा, दोन पिढ्या आणि दोन भिन्न विचार. यातून होणारी मानसिक कुचंबणा, बदलणारे नात्यांचे संदर्भ आणि त्या नात्यांमधील भावनांची हळवी गुंफण याचे सुंदर सादरीकरण गोष्ट घराकडील या नाटकात प्रेक्षकांनी अनुभवले. दरमहा प्रायोगिक रंगभूमीवर एकांकिकेच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करणाऱ्या संजय भाकरे फाऊंडेशनची ही ३२ वी एकांकिका होती. गजानननगर समाज भवन, हिंदुस्तान कॉलनीच्या रंगमंचावर सादर झालेली ही एकांकिका ज्येष्ठ अभिनेत्री नलूताई गोळवलकर यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली डॉ समीर मोने लिखित आणि अनिता भाकरे निर्मित या एकांकिकेचे दिग्दर्शन सुबोध सुर्जीकर यांनी केले होते. संगीत- राखी वैद्य, प्रकाश योजना- ऋषभ धापोडकर, बाल्या लारोकर, नेपथ्य- सतीश काळबांडे यांचे होते. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक दीपा पत्की आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय भाकरे यांनी नटराज पूजन केले.