सणासुदीत साखरेचा गोडवा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 05:12 AM2018-08-05T05:12:37+5:302018-08-05T05:12:48+5:30

साखरेचे किरकोळ बाजारातील विक्रीचे दर विदर्भात ३ महिन्यात १२ रुपयांनी वाढून ४२ रुपये प्रतिकिलो झाला आहे.

The sweetness of the festive season is expensive | सणासुदीत साखरेचा गोडवा महागला

सणासुदीत साखरेचा गोडवा महागला

googlenewsNext

नागपूर : साखरेचे किरकोळ बाजारातील विक्रीचे दर विदर्भात ३ महिन्यात १२ रुपयांनी वाढून ४२ रुपये प्रतिकिलो झाला आहे. परिणामी सणासुदीत साखरेचा गोडवा महागला आहे.
संपूर्ण विदर्भात पश्चिम महाराष्ट्रातून साखर येते. जवळपास प्रति बोरीमागे (पोते) १७५ ते १९० रुपये वाहतूक खर्च येतो. त्यामुळे सध्या घाऊक बाजारात साखरेचा भाव दर्जानुसार ३५ ते ३६ रुपये पडतो. किरकोळ विक्रेता ही साखर किलोमागे ४ ते ६ रुपये जादा दराने विकतो. त्यामुळे ग्राहकांना किरकोळ बाजारातून साखर ४० ते ४२ रुपये प्रति किलो भावात खरेदी करावी लागत आहे.
देशात अतिरिक्त साखरेचे उत्पादन झाल्याने घाऊक बाजारातील साखरेचे दर २५ रुपयापर्यंत घसरले होते. यामुळे साखर उद्योग अडचणीत आला होता. हे दर वाढावेत यासाठी केंद सरकारने विविध उपाययोजना करताना कारखान्यांना साखरेच्या विक्रीेचा किमान दर २९ रुपये प्रतिकिलो निश्चित करुन दिला . यानंतर साखरेचे दर वाढण्यास सुरवात झाली. सध्या साखरेचे दर ३१५० रुपये (जीएसटी व्यतिरिक्त) प्रतिक्विंटलच्या आसपास आहेत. पश्चिम महाराष्टÑात साखरेचे किरकोळ विक्रीचे दर ३५ ते ३६ रुपयांच्या दरम्यान आहेत.
।एप्रिलमध्ये किरकोळ बाजारात ३० रुपयात विकण्यात येणाऱ्या साखरेचे भाव मे महिन्यात ३४ ते ३६ रुपयांवर पोहोचले आणि आॅगस्टपर्यंत भावात मोठी वाढ झाली. सणासुदीत आणखी एक किंवा दोन रुपयांनी साखर महाग होऊ शकते
- रामदास वजानी,
साखरेचे घाऊक विक्रेते
महागाईच्या काळात पूर्वीच पेट्रोलच्या वाढीव भावामुळे वाढलेले महिन्याचे बजेट साखरेने आणखी वाढविले आहे. शासनाने कारखानदारांना फायदा मिळवून देण्यासाठी ग्राहकांचा विचार केलेला नाही. - महेंद्र आदमने, ग्राहक़

Web Title: The sweetness of the festive season is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.