'तू माझ्या पाठीमागे कुणाला भेटते' असे विचारत त्याने केले सपासप वार; कोराडीत थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2023 20:30 IST2023-03-15T20:30:00+5:302023-03-15T20:30:47+5:30

Nagpur News मानलेल्या भावाला भेटायला गेलेल्या पत्नीवर संशयातून पतीकडून वार करण्यात आले. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Suspicious husband stabs wife who went to meet brother | 'तू माझ्या पाठीमागे कुणाला भेटते' असे विचारत त्याने केले सपासप वार; कोराडीत थरार

'तू माझ्या पाठीमागे कुणाला भेटते' असे विचारत त्याने केले सपासप वार; कोराडीत थरार

नागपूर : मानलेल्या भावाला भेटायला गेलेल्या पत्नीवर संशयातून पतीकडून वार करण्यात आले. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सिद्धार्थ भीमराव मेश्राम (४२, महेंद्रनगर, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी निशा (३७) ही मंगळवारी दुपारी पूजा तुंगा (२८, मसाळा, कोराडी) यांच्या घरी गेली होती. पूजाच्या पतीला निशा राखी बांधते व ती त्याला भाऊ मानते. निशा तुंगा कुटुंबीयांकडे आली असता सिद्धार्थदेखील मागेमागे पोहोचला. त्याला पत्नीवर संशय असून त्यातून त्याने अनेकदा वाददेखील घातला आहे. संशयाच्या याच सवयीतून तो तेथे पोहोचला व त्याने शिवीगाळ सुरू केली. तू माझ्या पाठीमागे कुणाला भेटते असे विचारत त्याने ‘तू माझी झाली नाही तर मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही’ असे म्हणत निशाचा गळा, हात व पोटावर चाकूने वार केले. ती गंभीर जखमी झाल्याचे पाहून तो पळून गेला. पूजा तुंगाने निशाला मेयो इस्पितळात दाखल केले. पूजाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली आहे.

Web Title: Suspicious husband stabs wife who went to meet brother