नागपुरातील  विनयभंगाचा आरोपी पीएसआय निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:30 PM2019-06-19T23:30:45+5:302019-06-19T23:31:35+5:30

महिलेचा विनयभंग करणारा आरोपी असलेला अजनी पोलीस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे याला आज निलंबित करण्यात आले. यासोबतच त्याच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Suspended PSI accused of molestation in Nagpur | नागपुरातील  विनयभंगाचा आरोपी पीएसआय निलंबित

नागपुरातील  विनयभंगाचा आरोपी पीएसआय निलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलेचा विनयभंग करणारा आरोपी असलेला अजनी पोलीस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे याला आज निलंबित करण्यात आले. यासोबतच त्याच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
२१ मे रोजी नवीन बाभुळखेडा येथे एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास टेमगिरी करीत होते. टेमगिरीला या प्रकरणातील तक्रारकर्त्यांचे बयाण नोंदवायचे होते. तक्रारकर्ता मेडिकलमध्ये भर्ती असल्याने टेमगिरेने त्याच्या बहिणीशी संपर्क केला. त्यांनी २७ मे ते १३ जून दरम्यान तक्रारकर्त्यांच्या बहिणीशी चर्चा केली. यादरम्यान ते तक्रारकर्त्याच्या बहिणीला ठाण्यात बोलावू लागले. तिला रात्री उशिरापर्यंत ठाण्यात बसवून ठेवायचे. १३ जून रोजी तिला चित्रपट पाहण्यासाठी सोबत चालण्यास सांगितले. तिला व्हॉट्सअ‍ॅपवर चित्रपटाचे तिकीटही पाठवले. महिलेने याची डीसीपी राजतिलक रौशन यांचच्याकडे तक्रार केली. प्रकरण गंभीर असल्याने रौशन यांनी बेलतरोडी पोलिसांकडून याची चौकशी केली. तक्रारकर्त्यासोबत झालेल्या बोलण्यातून टेमगिरी दोषी असल्याचे आढळून आले. याआधारावर १५ जून रोजी टेमगिरे यांच्याविरुद्ध अजनी ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून टेमगिरे गायब आहे. त्याचा फोनही स्वीच ऑफ आहे. तपासादम्यान बेलतरोडी पोलिसांनी टेमगिरेविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे. रौशनने पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची विशेष रिपोर्ट पाठवला होता. त्या आधारावर त्याला बुधवारी निलंबित करण्यात आले. या प्रकरणामुळे अजनी ठाण्यात खळबळ उडाली आहे. अधिकारीही आश्चर्यचकित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, टेमगिरे जिथे बसत होते तिथे महिला अधिकारीही उपस्थित राहत होत्या. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, टेमगिरेने तिला पाठवलेले चित्रपटाचे तिकीट ठाण्यामध्येच तिच्या मोबाईलमधून डिलीट सुद्धा करण्यात आले आहे.

Web Title: Suspended PSI accused of molestation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.