शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

श्रीनिधीच्या स्वरांच्या हार्मनीने जिंकले

By admin | Updated: December 24, 2014 00:41 IST

जुन्या-नव्या गीतांचे सादरीकरण करीत आज ‘हार्मनी विथ श्रीनिधी’ या गीतांच्या कार्यक्रमात श्रीनिधी घटाटे या गुणी गायिकेने रसिकांना जिंकले.

जुन्या-नव्या गीतांचे सादरीकरण : हार्मनी विथ श्रीनिधी नागपूर : जुन्या-नव्या गीतांचे सादरीकरण करीत आज ‘हार्मनी विथ श्रीनिधी’ या गीतांच्या कार्यक्रमात श्रीनिधी घटाटे या गुणी गायिकेने रसिकांना जिंकले.एरवी गीतांचे अनेक कार्यक्रम होतात. त्यात प्रामुख्याने जुनी चित्रपटगीतेच सादर केली जातात. या गीतांचा खास असा प्रेक्षकवर्गही आहे. पण नवे संगीतकारही सध्या चांगले संगीत देत आहेत. अनेक अवीट गीतांची निर्मिती हे संगीतकार करीत आहेत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित गीते, ठुमरीसदृश गीते रसिकप्रियही होत आहेत. पण बहुधा नवी गीते कार्यक्रमात सादर करण्यात येत नाहीत. श्रीनिधीने मात्र आजच्या कार्यक्रमात अनेक नव्या गीतांच्या सादरीकरणानेही रंगत आणली. सिद्धिविनायक पब्लिसिटीद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात मयंक लखोटिया आणि श्रीनिधी घटाटे यांनी तयारीने सादरीकरण करून रसिकांची दाद घेतली. श्रीनिधी ही गोड गळ्याची गायिका आहे. तिच्या गायनावर रसिकांचे प्रेमही आहे. त्यामुळेच श्रीनिधीचा स्वतंत्र कार्यक्रम ऐकण्यासाठी रसिकांनीही सभागृहात गर्दी केली होती. प्रामुख्याने महाविद्यालयीन रसिकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यात श्रीनिधीने ‘मै तेणु समझावाणी...’ या सध्या लोकप्रिय असलेल्या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ केला आणि त्यानंतर तिने अनेक गीतांनी रसिकांची दाद घेतली. वन्समोअर, टाळ्या घेत तिचा हा कार्यक्रम रंगला. याप्रसंगी श्रीनिधीने ‘लग जा गले..., क्या जानु सजन..., वो जो अधुरीसी बात बाकी है..., सावन बिता जाए पियरवा..., मोरा सैंया मोसे बोले ना..., सुन रहा है न तु..., तु तू है वही...इश्क सुफियाना...’ अशा विविधांगी गीतांनी रंगत आणली. सुफी शैली, ठुमरी शैलीतील गीतेही तिने नजाकतीने सादर करून तिच्या गानक्षमतेचा परिचय दिला. भविष्यात एक चांगली गायिका होण्याची नांदीच या तिच्या सादरीकरणात होती. तरल भावस्पर्शी आवाज आणि स्वरांची जाण तिच्या गायनाचे सामर्थ्य म्हणावे लागेल. याप्रसंगी मयंक लखोटियानेही रसिकांना जिंकले. ‘मर जाऊ या जी लू जरा...’ सारख्या अनेक गीतांनी त्याने वन्समोअर घेतला. कार्यक्रमाचे निवेदन रूपाली कोंडेवार-मोरे यांनी केले. (प्रतिनिधी)