शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हृदयघात झालेल्या रुग्णाचे असे वाचवू शकता प्राण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:44 PM

हृदयरोगींना हृदयविकाराचा धक्का (हार्ट अटॅक) कुठेही आणि कुठल्याही क्षणी येऊ शकतो. रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाल्यास त्या रुग्णाचे प्राणही जाण्याचा धोका असतो. अशावेळी रुग्णालयाचे पथक येईपर्यंत एखाद्या जाणकाराने प्रथमोपचार दिल्यास त्या रुग्णाचे प्राण वाचविले जाऊ शकतात. म्हणूनच मेघे ग्रुपच्या एडीसीसी अकॅडमीतर्फे माध्यम प्रतिनिधींसाठी हार्ट सेव्हर आणि बेसिक फर्स्ट एड (प्रथमोपचार) च्या प्रशिक्षणाची कार्यशाळा शुक्रवारी आयोजित करण्यात आली.

ठळक मुद्देमाध्यम प्रतिनिधींना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण : एडीसीसी अकॅडमीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हृदयरोगींना हृदयविकाराचा धक्का (हार्ट अटॅक) कुठेही आणि कुठल्याही क्षणी येऊ शकतो. रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाल्यास त्या रुग्णाचे प्राणही जाण्याचा धोका असतो. अशावेळी रुग्णालयाचे पथक येईपर्यंत एखाद्या जाणकाराने प्रथमोपचार दिल्यास त्या रुग्णाचे प्राण वाचविले जाऊ शकतात. म्हणूनच मेघे ग्रुपच्या एडीसीसी अकॅडमीतर्फे माध्यम प्रतिनिधींसाठी हार्ट सेव्हर आणि बेसिक फर्स्ट एड (प्रथमोपचार) च्या प्रशिक्षणाची कार्यशाळा शुक्रवारी आयोजित करण्यात आली.एडीसीसीसह अमेरिकन हार्ट असोसिएशनअंतर्गत कार्यरत इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर (आयटीसी) व जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, सावंगी यांच्या संयुक्त विद्यामाने स्कूल आॅफ स्कॉलर्स, अत्रे ले-आऊट येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. स्कूल आॅफ व्हर्च्युअल लर्निंगचे संचालक डॉ. सुनील निकोसे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे सीईओ डॉ. संदीप श्रीवास्तव, आयटीसीचे डॉ. वीरेंद्र बेलेकर, स्कूल आॅफ डिस्टन्स लर्निंगच्या संचालिका डॉ. अंजली बोरले, एडीसीसी अकॅडमीचे प्रमुख डॉ. बी. इबेनेझर यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रथमोपचाराचे व जीवन सुरक्षेचे प्रशिक्षण दिले. बाजार, मॉल, बस, ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा रस्त्यावर आपल्या सोबतच्या किंवा अनोळखी व्यक्तीला हृदयघाताचा धक्का आल्यास आपल्याकडे प्रथमोपचार देण्याचे कौशल्य असले पाहिजे. त्यासाठी योग्य पद्धत जाणून घेणे गरजेचे आहे. हृदयघात झालेल्या व्यक्तीला प्रथम तपासणे, त्यानंतर त्याला पालथा झोपवून छातीच्या मध्यभागी पम्प करणे व कृत्रिम श्वास देणे आवश्यक आहे. तीनदा पम्प व दोनदा कृत्रिम श्वास, ही क्रिया दोन मिनिटात पाच वेळा करावी. अशावेळी एईडी मशीन असल्यास त्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. रुग्णालयाचे पथक दाखल होईपर्यंत ही क्रिया केल्यास संबंधित रुग्णाचे प्राण वाचविले जाउ शकतील, असा विश्वास डॉ. निकोसे यांनी यावेळी दिला. कार्यशाळेत लोकमतसह इतर माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळी एडीसीसीचे विशाल जग्यासी, पारुल देशभ्रतार, डॉ. सुनील लोंढे, कोरेना परेरा आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटका