शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अज्ञानामुळे मागितले जातात सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे :एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:35 AM

वायुसेनेचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी सैन्यदलाबाबत असलेल्या अज्ञानामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागितले जात असल्याची भावना शुक्रवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली.

ठळक मुद्देकारवाईने भविष्याची दिशा ठरेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वायुसेनेचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी सैन्यदलाबाबत असलेल्या अज्ञानामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागितले जात असल्याची भावना शुक्रवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली.अहिल्या मंदिर, धंतोली येथे आयोजित व्याख्यानात ते म्हणाले, ‘सर्जिकल स्ट्राईक’ ही सोपी गोष्ट नाही. अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे अशी कारवाई केली जाऊ शकते. मिळालेली माहिती आणि अनुभवाच्या आधारे कारवाईबाबत अंदाज व्यक्त करताना त्यांनी सांगितले, २६ फेब्रुवारीला संबंधित बालाकोट या ठिकाणी जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी गोळा असल्याची गुप्त माहिती वायुसेनेला मिळाली. कदाचित इस्रायली सॅटेलाईटच्या माध्यमातून भारतीय सॅटेलाइट ‘रिसॅट-२’ ला ही माहिती प्राप्त झाली आणि तिथून ती वायुसेनेपर्यंत पोहचली. त्यानुसार ‘मिराज २०००’ ला निर्देश देण्यात आले. या माहितीचे १५ मिनिटात आदानप्रदान झाले असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. रात्री कारवाई करणे कठीण असतानाही भारतीय वायुसेनेने माहितीच्या आधारे तंतोतंत कारवाई फत्ते केल्याचा दावा चाफेकर यांनी केला. ठरलेल्या लक्ष्यावर मिसाईलने मारा करण्यात आला. मिसाईलच्या माऱ्यामुळे खड्डा पडतो आणि तेथील सर्वकाही नष्ट होते. त्याचे सॅटेलाईट इमेज मिळणे शक्य नसते. मात्र या सर्व गोष्टी आणि सैन्यदलातर्फे चालणाऱ्या कारवायांबाबत लोकांमध्ये अज्ञान असल्याने ते एअर स्ट्राईकचे पुरावे विचारत असल्याची टीका त्यांनी केली. आपला देश शांतताप्रिय आहे व वाद नको असतात. शिवाय निर्णय घेण्यामध्येही लकवा मारल्यासारखी स्थिती होती. मात्र यावेळी वायुसेनेद्वारे घेण्यात आलेल्या कारवाईचा निर्णय धाडसी होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुलवामा हल्ल्यात आरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतरआर्थिक, धोरणात्मक आणि सैन्यस्तरावर दबाव बनविण्याचे पर्याय भारताजवळ होते. भारताने वायुसेनेची निवड करून मोठी गोष्ट साधल्याचे मनोगत व्यक्त करीत ही कारवाई भविष्यात येणाºया शासनाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास चाफेकर यांनी व्यक्त केला.अमेरिका स्वत:चा कमीपणा लपवितोपाकिस्तानचे एफ -१६ हे युद्धविमान भारताने मारलेच नसल्याचा दावा अमेरिकेतर्फे नुकताच केला गेला. त्यामुळे याबाबत संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. मात्र एफ-१६ हे विमान अमेरिकेनेच पाकिस्तानला दिले आहे आणि जगभरात त्याचा व्यापार ते करतात. त्यामुळे हे विमान पाडल्याचा दावा केल्याने त्यांच्या विमानाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होतो. ही कमतरता लपविण्यासाठीच त्यांच्याकडून असा दावा केला जात असल्याचे मत सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकnagpurनागपूर