शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालय : बेझनबाग अतिक्रमण प्रकरणी यथास्थिती ठेवण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:44 IST

बेझनबाग सोसायटीमधील अवैध बांधकामे पाडण्याच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी याचिका ऐकल्यानंतर या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला. तसेच, प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्यास सांगितले. या अंतरिम आदेशामुळे ३६९ पीडित कुटुंबांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देराज्य सरकारची विशेष अनुमती याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेझनबाग सोसायटीमधील अवैध बांधकामे पाडण्याच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी याचिका ऐकल्यानंतर या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला. तसेच, प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्यास सांगितले. या अंतरिम आदेशामुळे ३६९ पीडित कुटुंबांना दिलासा मिळाला.याचिकेवर न्या. रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीवर भूखंड पाडून ते विकण्यात आले आहेत. त्या भूखंडांवर मोठमोठी घरे बांधण्यात आली आहेत. त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यामध्ये उच्च न्यायालयाने गत २६ फेब्रुवारी रोजी अवैध बांधकामे पाडण्याचा आदेश दिला होता. सोसायटीमधील अतिक्रमण असलेली ५४ हजार ४३७.१९ चौरस मीटर जमीन मैदाने, उद्याने इत्यादी ओपन स्पेसकरिता आरक्षित आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या चौकशी अहवालानुसार, या जमिनीवर ३६९ व्यक्तींचे अतिक्रमण आहे. ३७९५.४७ चौरस मीटर जमिनीवर ३४ मिल कामगारांनी, ३५ हजार १६२.०४ चौरस मीटर जमिनीवर मिल कामगारांचे ३०८ वारसदारांनी तर, ३५९५.६५ चौरस मीटर जमिनीवर इतर २८ व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. उर्वरित जमिनीवर बुद्धविहार, गोदाम, दुकाने इत्यादी विविध प्रकारचे अतिक्रमण आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. निशांत काटनेश्वरकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयOrder orderआदेश केणे