नागपुरात रेशन दुकानातून निकृष्ट चणाडाळीचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:08 IST2020-06-29T21:07:01+5:302020-06-29T21:08:45+5:30
कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळल्याने लोकांच्या रेशनच्या धान्यासाठी रांगा लागत आहे. पण रेशनच्या धान्यातून लाभार्थ्यांना निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याची कार्डधारकांची ओरड होत आहे.

नागपुरात रेशन दुकानातून निकृष्ट चणाडाळीचा पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळल्याने लोकांच्या रेशनच्या धान्यासाठी रांगा लागत आहे. पण रेशनच्या धान्यातून लाभार्थ्यांना निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याची कार्डधारकांची ओरड होत आहे. खरबी येथील एका रेशन दुकानातून लाभार्थ्याला मिळालेली चण्याची डाळ निकृष्ट दर्जाची आहे. ती खाल्ल्यास आरोग्यास अपायकारक ठरणारी आहे. रेशनचे धान्यही विकतच घ्यावे लागते. शासनाने ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे खाण्यायोग्य नसलेले धान्य लाभार्थ्यांना वितरण करू नये. आरोग्यास अपायकारक डाळीचा पुरवठ्याला कोण दोषी आहे, याची चौकशी करण्याची मागणी जि.प. सदस्य सुभाष गुजरकर यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.