नागपूरकरांचे प्रेम बघून भारावले महानायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:56 IST2018-12-08T21:48:38+5:302018-12-08T21:56:15+5:30
शहरात सुरू असलेल्या हिंदी सिनेमाच्या शुटींगसाठी आलेले महानायक अमितभा बच्चन यांना बघण्यासाठी नागपूरकर चांगलेच उत्सुक आहेत. कालपर्यंत मोहननगर येथे गर्दी करणाऱ्या त्यांच्या फॅन्सनी आपला मोर्चा वर्धा रोडावरील हॉटेलकडे वळविला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडून बिग बी पर्यंत कुणालाही पोहचू दिले जात नसले तरी अनेक प्रयत्नानंतर गुरुवारी त्यांच्या फॅन्सनी अमिताभ यांना हॉटेलच्या लॉबीमध्ये अखेर घेरलेच. अमिताभ यांनी सर्वांचे अभिनंदन करीत हसत हसत आपल्या रुमकडे निघून गेले.

नागपूरकरांचे प्रेम बघून भारावले महानायक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सुरू असलेल्या हिंदी सिनेमाच्या शुटींगसाठी आलेले महानायक अमितभा बच्चन यांना बघण्यासाठी नागपूरकर चांगलेच उत्सुक आहेत. कालपर्यंत मोहननगर येथे गर्दी करणाऱ्या त्यांच्या फॅन्सनी आपला मोर्चा वर्धा रोडावरील हॉटेलकडे वळविला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडून बिग बी पर्यंत कुणालाही पोहचू दिले जात नसले तरी अनेक प्रयत्नानंतर गुरुवारी त्यांच्या फॅन्सनी अमिताभ यांना हॉटेलच्या लॉबीमध्ये अखेर घेरलेच. अमिताभ यांनी सर्वांचे अभिनंदन करीत हसत हसत आपल्या रुमकडे निघून गेले.
अमिताभ बच्चन यांनी स्वत: हॉटेल व्यवस्थापनाला सांगितले आहे की, जोपर्यंत शुटींगसाठी थांबलो आहे, तोपर्यंत शांतीने काम करू द्यावे. अमिताभला त्यांच्या फॅन्सपासून दूर ठेवण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. असे असताना अमिताभ गुरुवारी जसे हॉटेलात पोहचले तेव्हा त्यांच्या शेकडो फॅन्सनी हॉटेलच्या लॉबीमध्येच त्यांना घेरले. अमिताभचे बाऊन्सर्सनी सुरक्षा घेरा बनविण्यापूर्वीच त्यांच्या फॅन्सनी स्मार्ट फोन काढून सेल्फी काढणे सुरू केले. फॅन्सकडे बघून ते हसले आणि बाऊन्सर्सच्या मदतीने लॉबीतून निघून आपल्या रुममध्ये गेले. यावेळी त्यांनी आपल्या फॅन्सला हात जोडून अभिवादन केले.
यानंतर अमिताभ यांनी तीन फोटोसोबत एक ट्विट केला. ज्यात त्यांनी लिहिले आहे ‘... और प्यार अब भी बरकरार है. रोड पर, हॉटेल की लॉबी में और मेरे हृदय में. धन्यवाद नागपूर आपके प्यार के लिए ’. विशेष म्हणजे अमिताभ यांनी ट्विट केल्यानंतर नागपुरातील १२ हजार फॅन्सनी त्याला लाईक केले तर ६९५ लोकांनी त्याला रिट्विट केले.