शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात सुमीत ठाकूर हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:43 IST

पोलिसांसोबत लपवाछपवी करून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात गुंड सुमीत ठाकूर मला दोन दिवसात पोलिसांच्या कस्टडीत हवा आहे. अन्यथा मीच हातात दंडा घेऊन रस्त्यावर उतरेन. नंतर तुमचा कोणताही युक्तिवाद मान्य केला जाणार नाही, असा खणखणीत इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला होता. त्यामुळे शहरातील अख्खी पोलीस यंत्रणाच कुख्यात सुमीतला शोधण्यासाठी कामी लागली होती. त्याचाच परिणाम म्हणून कुख्यात सुमीत ठाकूरच्या मुसक्या बांधण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनीच दस्तूरखुद्द हा खुलासा पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना केला. शनिवारी सायंकाळी ते पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा करीत होते. येथील गुन्हेगारी कशी नियंत्रित करायची, याबाबतच्या कल्पना विशद करताना त्यांनी पोलिसांना कसे सक्रिय करायचे,याचे उदाहरण आज सांगितले.

ठळक मुद्देअन्यथा मीच हातात दंडा घेईल : पोलीस आयुक्तांनी दिला होता इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांसोबत लपवाछपवी करून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात गुंड सुमीत ठाकूर मला दोन दिवसात पोलिसांच्या कस्टडीत हवा आहे. अन्यथा मीच हातात दंडा घेऊन रस्त्यावर उतरेन. नंतर तुमचा कोणताही युक्तिवाद मान्य केला जाणार नाही, असा खणखणीत इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला होता. त्यामुळे शहरातील अख्खी पोलीस यंत्रणाच कुख्यात सुमीतला शोधण्यासाठी कामी लागली होती. त्याचाच परिणाम म्हणून कुख्यात सुमीत ठाकूरच्या मुसक्या बांधण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनीच दस्तूरखुद्द हा खुलासा पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना केला. शनिवारी सायंकाळी ते पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा करीत होते. येथील गुन्हेगारी कशी नियंत्रित करायची, याबाबतच्या कल्पना विशद करताना त्यांनी पोलिसांना कसे सक्रिय करायचे,याचे उदाहरण आज सांगितले.कुख्यात गुंड पिन्नू पांडेवर आपल्या टोळीतील गुंडांकडून हल्ला करवून घेणारा सुमीत ठाकूर पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होता. प्रत्यक्षात तो हद्दपार असूनही नागपूर आणि आजूबाजूलाच राहत होता. एवढेच नव्हे तर खंडणी वसुली आणि गुन्हेगारीही करीत होता. महिनाभरापूर्वी त्याची प्रतिस्पर्धी गुंडासोबत झालेली शाब्दिक चकमकीची आॅडिओ क्लीप व्हायरल झाली होती. गेल्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांना धमकावण्यासाठी, पैशाने त्यांचे मन वळविण्यासाठी सुमीत आपल्या टोळीतील गुंडांसह ठाण मांडून बसला होता. पोलिसांना मात्र तो आढळत नव्हता. एक गुंडा नागपुरात सक्रिय असूनही पोलिसांना आढळत नसल्याची माहिती कळाल्याने डॉ. उपाध्याय कमालीचे संतप्त झाले. त्यांनी शहर पोलीस दलातील वरिष्ठांची बैठक घेतली. गुरुवारी त्यांना खणखणीत इशारा दिला. दोन दिवसात कुख्यात सुमीत ठाकूर पोलिसांच्या कस्टडीत हवा. तुम्ही अटक करू शकला नाही तर मी स्वत: दंडा हातात घेऊन सुमीतचा शोध घेईल. त्याला अटक करेन. नंतर मात्र, कुणाची कोणतीही सबब अथवा युक्तिवाद मान्य केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. हा इशारा पोलिसांत खळबळ उडविणारा ठरला. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली.सुमीतचा ९ पर्यंत पीसीआरगिट्टीखदान पोलिसांनी त्याला कोर्टात हजर करून त्याचा ९ आॅगस्टपर्यंत पीसीआर मिळवला. सुमीतवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. त्यात त्याला कोर्टातून सशर्थ जामीन मिळाला. या शर्थीचे सुमीतने उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्याच्यावर पुन्हा मोक्का लावण्यासाठीही पोलीस प्रयत्न करणार आहेत.मित्राच्या नादात मिस इंडिया कोठडीत जाणार?कुख्यात सुमीत ठाकूरची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असूनही त्याला आपल्या घरात आश्रय दिल्यामुळे त्याची मैत्रीण, मिस इंडिया उर्वशी साखरे चांगलीच अडचणीत आली आहे. वॉन्टेड गुन्हेगाराची मदत केल्याच्या आरोपाखाली पोलीस तिला अटक करू शकतात. त्यासंबंधाने कायदेशिर बाबी तपासल्या जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर