शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

'सुलतान' अखेर बोरिवलीकडे रवाना : मुंबईतून अद्ययावत अँब्युलन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 8:13 PM

गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ (सी-१) नावाच्या वाघाची मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी झाली.

ठळक मुद्दे९०० किमीच्या प्रवासासाठी विशेष हायड्रॉलिक पिंजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ (सी-१) नावाच्या वाघाची मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी झाली.

बोरिवली येथून वनक्षेत्रपाल विजय बारब्दे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आदींचे पथक आले होते. मंगळवारी दुपारी कायदेशिर सोपस्कर पार पडल्यावर वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. एस.व्ही. उपाध्ये, उपसनचालक डॉ. व्ही.एम. धुत, डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. मयूर पावशे, डॉ. ए. एस. शालिनी या वैद्यकीय पथकाच्या चमुने वाघाची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर दुपारी ३ वाजता बोरीवलीची चमु विशेष अँबुलन्स घेऊन सुलतानसह मुंबईकडे रवाना झाले. गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही हस्तांतराची कारवाई करण्यात आली.या वाघाला नागपूर ते मुंबई हे ९०० किलोमिटरचे अंतर पार करायचे आहे. त्यासाठी विशेष हायड्रॉलिक पिंजऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून सुलतानला त्यातून नेण्यात येत आहे.बोरिवली उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या तीन वाघिणी आहेत. त्यांच्यासाठी प्रजननक्षम वाघाचा शोध होता. त्यानुसार कायदेशीर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याने सुलतानला त्यांच्याकडे सोपविण्यात आले.दोन जणांचा बळी घेणाऱ्या या वाघाला ब्रह्मपुरी येथून २०१८ मध्ये पकडून आणले होते. वन विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोरेवाडा आंतरराज्यीय प्राणिसंग्रहालय तो मुक्कामी होता. वर्षभराच्या मुक्कामानंतर आता तो बोरिवलीवासी होत आहे.

टॅग्स :TigerवाघGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालयMumbaiमुंबई